Posts

Showing posts from February, 2024

संजयजी घोडावत

Image
 सामान्यातील असामान्य संजयजी घोडावत "सुशीलेच्या सुसंस्कारातून घडला, दानचंदांची दानशूरता शिकला, नीतिमत्तेची नीताभाभीची साथ सोबतीला, मग कोणत्याही पराजयाची भीती संजयजीना कशाला?" संजयजी दानचंदजी घोडावत नावाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात जय म्हणजेच यश प्राप्त करणारे हे व्यक्तिमत्व. यशस्वी, प्रतिभाशाली, तत्वनिष्ठ, दानशूर, उद्योजक, शिक्षणातील दीपस्तंभ, पायलट, अशा अनेक बिरुदावलींनी सुपरिचित असणारे हे व्यक्तिमत्व.  दिडवाना राजस्थान येथील त्यांचे मूळ घराणे असले तरी व्यवसायाच्या निमित्ताने ते महाराष्ट्रात आले आणि कायमचेच मराठी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील जय‌सिंगपूर येथे दानचंदजी घोडा‌वत व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले. दि २८ फेब्रुवारी १९६५ रोजी सुशीला व दानचंद यांच्या पोटी संजय नावाचे कर्तृत्ववान रत्न जन्मले. एकदम सुसंस्कृत, प्रतिभाशाली अशा जैन समाजात जन्मलेल्या संजयजींना  माता-पित्यांकडून संस्काराचा ठेवा मिळाला. संजयजींचे बालपण जय‌सिंगपूरातच गेले. शालेय शिक्षण जयसिंगपूरमधील जयसिंगपूर हायस्कूलमध्ये झाले. 'स्वप्ने नेहमी मोठी पहावीत. ती स्वप्ने सत्यात उतरवण्याची स्वतःत धमक निर्माण ...