Posts

Showing posts from May, 2024

जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम ’ग्लोबल सिटीझन' घडवू : संजय घोडावत

Image
   जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम ’ग्लोबल सिटीझन'  घडवू  संजय घोडावत चेअरमन, संजय घोडावत  पुणेः-  शैक्षणिक प्रगतीसह दैनंदिन जीवनाशी संबंधित कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत करून देण्यावर आमचा भर राहणार असून झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम 'ग्लोबल सिटीझन' घडवू, असा विश्वास संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांनी व्यक्त केले.  सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरीटेबल ट्रस्टतर्फे मुळशी मधील रावडे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुल या शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन चेअरमन संजय घोडावत यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल रावडे, मुळशी, पुणेच्या संचालक आणि मुख्याध्यापक सस्मिता मोहंती, विश्वस्त विनायक भोसले, माहिती-तंत्रज्ञान विभाग प्रमुख लकी सुराणा, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल रावडे, मुळशीचे मुख्याध्यापक मायकल पिअरसन, उपमुख्याध्यापक दुश्यंत अभिजीत आणि अर्चना पाटील, विश्वस्त फरहान अझर, मार्गदर्शक दर्पण वासुदेव आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी बोलताना संज...

दहावीनंतर करीअर संधी

दिनांक 27 मे 2024 रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागला आहे , उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 10 वी नंतर नेमके काय करायचे हे माहीत नसल्यास आपण  संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. दहावीनंतर आपण लगेच करीयर ओरिएंडेट अभ्यासक्रमाच्या शोधात जातो , तर ज्यांना दहावीनंतर लगेचच जॉब हवा आहे , अशांनी आयटीआय मधील कोर्सेस / अभ्यासक्रम पुर्ण करावेत . ज्यांमध्ये आपणांस अनेक प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण करता येईल . त्यानंतर आपणांस स्वत : चा अथवा खाजगी / सरकारी कंपनी मध्ये लगेचच नोकरी मिळेल . आयटीआय मध्ये आपणांस , फिटर , टेलरिंग , कटींग , ब्युटी पार्लर , कारपेंटर , मोटार ड्रायव्हिंग कम मेकॅनिकल , फॅशन डिझायनिंग , प्लंबर , मेकॅनिकल डिझेल , मेकॅनिक , वेल्डर , बुक बाइंडर , स्टेनो , बेकरी , कुक , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , कोपा अशा प्रकारचे अनेक कोर्सेस करता येईल . ज्यांमध्ये आपणांस कोर्सेस पुर्ण झाल्याच्या नंतर लगेच स्वत : चा व्यवसाय अथवा खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळेल . 10 वी नंतर शैक्षणिक अभ्यासक्रम :  इयत्ता 10 वी नंतर आपण 11 वी इयत्तेत कला , विज्ञान , वाणिज्य शाखेत अभ्यासक्रम पुर्ण करु शकता...

एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून घोडावत विद्यापीठास रँकिंग जिल्ह्यात 1 ले,राज्यात 5 वे तर देशात 31 वे स्थान

Image
एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून घोडावत विद्यापीठास रँकिंग जिल्ह्यात 1 ले,राज्यात 5 वे तर देशात 31 वे स्थान अतिग्रे: एज्युकेशन वर्ल्ड या मासिका द्वारे देशभरात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांना 2024-25 चे श्रेयांकन जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट 300 विद्यापीठातून संजय घोडावत विद्यापीठाने खाजगी विद्यापीठांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम,राज्यात पाचवे तर देशात 31 वे स्थान पटकावले.       विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. ज्याचा लाभ विद्यार्थी घेत आहेत. उत्तम प्रशासन,उत्तम शिक्षण,सोयी- सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण...