Posts

Showing posts from June, 2024

ITI Education : व्यवसाय शिक्षणात मुलींचा कल ‘तंत्रज्ञ’ होण्याकडे

पुणे - एखाद्या कारखान्यात मोठ-मोठ्या यंत्रांसमोर वेल्डर, फिटर, तंत्रज्ञ म्हणून काम करताना काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त मुलेच दिसायची; परंतु आता तुम्हाला कारखान्यांमध्ये मुलांबरोबरच मुलीदेखील तंत्रज्ञ म्हणून काम करत असल्याचे दिसून येते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) विविध तांत्रिक क्षेत्रातील तंत्रज्ञ किंवा कुशल कारागीर (टेक्निशियन) होण्यासाठी संबंधित व्यवसाय अभ्यासक्रम निवडण्याकडे मुलींचा कल वाढत आहे. पुणे जिल्ह्यात शासकीय आयटीआयची संख्या १६ असून, त्यांची प्रवेश क्षमता साधारणत: पाच हजार ५०० आहे. तर जिल्ह्यातील ४५ खासगी आयटीआयमध्ये सहा हजार ५०० प्रवेश क्षमता आहे. प्रत्येक आयटीआयमध्ये एकूण प्रवेश क्षमतेच्या ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. तर जिल्ह्यात महिलांसाठी राखीव असणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधमध्ये असून, येथे २८०हून अधिक प्रवेश क्षमता आहे. मुलींना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम राबविले जातात. यामध्ये बेसिक कॉस्मोटोलॉजी, ड्रेस मेकिंग, फ्रुट्‌स ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, इंटेरियर डेकोरेशन ॲण्ड डिझायनिंग अशा पारंपरिक ...
- अभिक्रिया नियंत्रणासाठी यंत्रणा व तिची वेळोवेळी तपासणी - तापमान दाब नियंत्रण साधने बसवावीत. इमर्जन्सी किटची व्यवस्था असावी. - कामाची जागा स्वच्छ असावी, प्रथमोपचार सुविधा सदैव अद्ययावत ठेवाव्यात. - व्यवसायजन्य आजारांसंबंधी प्रमाणित शल्यचिकित्सकचा सल्ला घ्यावा. - घातक पदार्थ हाताळण्याची आणि कारखान्यात अशा हाताळणीचे पर्यवेक्षण करण्यासाठी - कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेसाठी विहित पद्धतीने सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पात्रता आणि अनुभव असलेल्या सक्षम व्यक्तींची नियुक्ती करणे.

इंडस्ट्रियल सेफ्टी माहिती आणि मार्गदर्शन

Image
आपल्या वैयक्तिक जीवनाप्रमाणेच उद्योग क्षेत्रात काम करणार्‍या अथवा या क्षेत्राशी संबंधित प्रत्येकासाठीच आपली व कामाच्या ठिकाणची सुरक्षितता सर्वोपरी महत्त्वाची असते. उद्योगातील सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या अशा ‘औद्योगिक सुरक्षितता’ या विषयाला विशेष चालना देण्यासाठी आपल्याकडे दरवर्षी दि. ४ ते ११ मार्च या कालावधीत ‘औद्योगिक सुरक्षा सप्ताह’ पाळला जाते. यामागे उद्योग क्षेत्रात सर्वांची सुरक्षा-सर्वोपरी सुरक्षा यावर भर देणार्‍या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा हा प्रासंगिक आढावा. 'औद्योगिक सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन राष्ट्रीय स्तरावर ‘राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा समिती’ म्हणजेच ‘नॅशनल सेफ्टी कौन्सिल’तर्फे करण्यात येते. त्यादृष्टीने उद्योग क्षेत्रात कायमस्वरुपी जनजागरण, सर्वांच्या सुरक्षेबद्दल जबाबदारीची जाणीव व प्रबोधन ही कामे सुरक्षा समितीतर्फे केली जातात. यासाठी समितीच्या प्रादेशिक वा राज्य स्तरीय कार्यालयांद्वारे प्रादेशिक प्रचार-प्रसार प्रबोधन प्रशिक्षण साहित्य वेळोवेळी उपलब्ध व प्रचारित केले.राष्ट्रीय स्तरावर औद्योगिक सुरक्षाविषयक काम अधिक व्यापक आणि प्रभावीपणे करण्यासाठी प्रत्येक रा...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सरुवात करण्यात आली. यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख, योगशिक्षक प्रा. पी. एम. पाटील यांनी 'आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४'ची थीम  या विषयी माहिती सांगून योग प्रार्थना घेऊन  विविध योगासन आणि त्यांचे प्रकार योग करण्याची पद्धती मेडिटेशन चे दैनंदिन जीवनात महत्वाचे स्थान, सूक्ष्म व्यायाम व त्यांचे  प्रकार, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रमारी भसत्रिका इ. प्राणायाम प्रकार आणि ताडासन, त्रिकोणासन, वृक्षासन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. सूर्यनमस्कार घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.   आंतरराष्ट्रीय योग दिवस मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमास संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व सेलचे समन्वयक, प्र...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

Image
  फोटो: वृक्षरोपण करतांना  प्राचार्य डॉ. विराट गिरी   प्रा. एस.एम. डिसोझा,  कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख, प्रा. अजय कोंगे,  प्रा. एस.एन. पाटील, गार्डन विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी. संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम कोल्हापूर :  5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केलाजातो. २०२४ ची थीम 'आमचीजमीन, आमचेभविष्य.' याअंतर्गत जमीन पुनर्संचयित करणं, वाळवंटीकरण आणि दुष्काळ या गोष्टींवर भर दिल्याजाणार आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत लोकांना जागरूक करणं खूप महत्त्वाचंआहे. निसर्गाशिवाय मानवी जीवन या पृथ्वी तलावर राहणार नाही. त्यामुळे झाडं, वनस्पती, जंगलं, नद्या, तलाव, पर्वत, जमीन यांचं महत्त्व समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे   आयोजन करण्यात आले होते.  प्राचार्य डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते वृक्षारोपणकरण्यात आले. यावेळी  प्रा.एस. एम.  डिसोझा,  कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रम...

संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना 'एज्युकेशन आयकॉन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

Image
पियुष खंडेलवाल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना विनायक भोसले विनायक भोसले यांना 'एज्युकेशन आयकॉन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान अतिग्रे: युनिव्हर्सल मेंटॉर असोसिएशन या दिल्ली स्थित संस्थेकडून, मुंबई येथे 15 जून रोजी झालेल्या 13 व्या एज्यु लीडर्स समिट आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना 'एज्युकेशन आयकॉन ऑफ द इयर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.         रॉक स्पोर्ट्स चे सह संस्थापक पियुष खंडेलवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार भोसले यांनी स्वीकारला.यावेळी असोसिएशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गुलाटी,सह संस्थापक अशितोष दुबे उपस्थित होते.         विश्वस्त विनायक भोसले यांचा संजय घोडावत शैक्षणिक संकुलाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. इंटरनॅशनल स्कूल, इन्स्टिट्यूट, आयआयटी व मेडिकल अकॅडमी, आणि विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये त्यांनी विशेष श्रम घेतले आहेत. यावर्षी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा विषयक सर्व सेवा कशा मिळतील याकडे विशेष लक्ष त्यांनी दिले आहे. नवे अभ्यासक्रम ...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विशेष करिअर मार्गदर्शन शिबारास विद्यार्थी व पालकांचा मोठा प्रतिसाद.

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विशेष करिअर मार्गदर्शन शिबारास विद्यार्थी व पालकांचा मोठा प्रतिसाद.    कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी डिप्लोमा, बी.ई. आणि बी. टेक इंजिनिअरिंग, आयटीआय,शासन मान्य अल्प मुदतीचे अभ्यसक्रम प्रवेश प्रकिया २०२४-२०२५ सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी अंतर्गत प्रथम वर्ष आभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना,  करिअरची योग्य दिशा या विषयावर इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी  विशेष करिअर मार्गदर्शन शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबारास कोल्हपुर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्तीतराहून प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे, विश्वस्त विनायक भोसले, उपस्थित पालकापैकी एक प्रतिनिधी पालक, विशेष करिअर मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक, प्राचार्य डॉ. विराट गिरी, यांनी दीप प्रज्वलन केले.  पालकांना व विद्यार्थांना  मार्गदर्शन करताना विश्वस्त, विनायक भोसले म्हणाले करिअरची दिशा निवड...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये विशेष करिअर मार्गदर्शन शिबाराचे आयोजन

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये विशेष करिअर मार्गदर्शन शिबाराचे आयोजन  कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी डिप्लोमा, बी.ई. आणि बी. टेक इंजिनिअरिंग, आयटीआय,शासन मान्य अल्प मुदतीचे अभ्यसक्रम प्रवेश प्रकिया २०२४-२०२५ सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी अंतर्गत प्रथम वर्ष आभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना,  करिअरची योग्य दिशा या विषयावर इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी  विशेष करिअर मार्गदर्शन शिबाराचे आयोजन गुरुवार दिनांक १३  जून  २०२४  रोजी सकाळी  ठीक. ११:०० वा. सेमिनार हॉल दुसरा मजला सी ब्लॉक संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे   कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व पालकांना संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.  इंजिनिअरिंग प्रवेशाच्या या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये: मेरिट लिस्ट विश्लेषण, शीट डिस्ट्रीब्यूशन मॅट्रिक्स, स्टेप इन फिलिंग ऑप्शन...

संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीचे नीट परीक्षेत यश

Image
संजय घोडावत आय आय टी  व मेडिकल अकॅडमीचे नीट परीक्षेत यश अतिग्रे : संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीने यावर्षीच्या नीट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. हर्षवर्धन देशमुख या विद्यार्थ्यांने 720 पैकी 715 गुण  प्राप्त करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.तसेच धीर मेहता, सुधांशु खवरे, प्रतीक रामतीर्थकर , सत्यजित जगताप  व संकेत सजागणे  यांनी   ७०५ गुण  मिळवून ऐतिहासिक निकालाची परंपरा कायम राखली.          मोहंमददारिज पुणेकर व ईशान जोशी यांनी अनुक्रमे ७०१ व ७०० असे गुण मिळवले. संस्थेच्या एकूण ८ विद्यार्थ्यांनी  ७०० पेक्षा अधिक गुण  मिळवले .सर्व विद्यार्थ्यांना संचालक श्री वासू सर व  प्रिन्सीपल श्री गुप्ता सर  यांचे मार्गदर्शन लाभले.    या यशाबद्दल बोलताना वासू सर  म्हणाले, नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व अविरत कष्टाची जोड असेल तर कोणत्याही चांगले यश संपादन करता येते. जेवढे मोठे स्वप्न असेल, तितकाच मोठा संघर्ष असेल, आणि जेवढा मोठा संघर्ष असेल, ...

Advance Diploma in Industrial Safety ( IT) Admission Open

Image
 Advance Diploma in Industrial Safety ( IT) Admission Open    Sanjay Ghodawat Institute-  1)     ADVANCE DIPLOMA IN INDUSTRIAL SAFETY (IT) इंजिनिअरिंग डिग्री , डिप्लोमा , सायन्स ग्रॅज्युएट च्या विद्यार्थ्यांनी नौकरी करिता स्पर्धेच्या युगात Advance Diploma in Industrial Safety (ADIS) diploma ची स्पेशलायझेशन शैक्षणिक पात्रता वाढविल्यास प्राधान्याने निशित नौकरी मिळू शकते. कारण गव्हर्नमेंट ह्युमन रिसोर्स सेक्शन सेफ्टी अँड हेल्थ ऑफ एम्प्लॉईज व्दारे फॅक्टरी अंक्ट अँड रुल्स ( Govt. Human Resources Section Safety and Health of Employees through Factory act and Rule)   नुसार प्रत्यक गव्हर्नमेंट सेक्टर , एम.एन.सी. कंपनी , मेजर इंडस्ट्रीज इत्यादी मध्ये सेफ्टी ऑफिसरच्या पदाची भरती अनिवार्य केलेली आहे.व नियमित पदभरती चालू आहे.याकरिता गुगल सर्च करा सेफ्टी ऑफिसर जॉब. तसेच सेफ्टी मॅनेजर , सिनियर सेफ्टी अनॅलिस्ट , सेफ्टी इंजिनियर , एच.एस.ई. ऑफिसर , सेफ्टी ऑडीटर व सेफ्टी सुपरवायजर इत्यादी पदावर नियमित नौकरीची संधी उपलब्ध असते. Prof. Ajay B. Konge HOD, Department ...