State Level Online Three Days Workshop on Establishing Small Scale Businesses संजय घोडावत पॉलीटेक्नीकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने तीन दिवसीय लघुउद्योग व्यवसाय उभारणी विविध योजना अनुदान मार्गदर्शन ऑनलाईन राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन दि. २६ एप्रिल ते २८ एप्रिल २०२१ या कालावधीत करण्यात आले होते. ही कार्यशाळा सलगर अमृततुल्य चहा यांनी पुरस्कृत कली होती. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार , महाविद्यालयीन युवक युवतीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. या कार्यशाळेचे पहिल्या दिवसाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ.ए.एम.गुरव , यांनी लघुउद्योग व्यवसाय , विविध उयोग संधीवर , लघुउद्योगा व्यवसायासाठी विविध योजनाची माहिती विविध संकल्पना स्पष्ट करून केले. या कार्यशाळेचे उद्घाटन मा. विराट गिरी, प्राचार्य संजय घोडावत पॉलीटेक्नीकच, अतिग्रे यांनी केले ते म्हणाले '' बेरोजगार तरुणा...