State Level Online Three Days Workshop on Establishing Small Scale Businesses
संजय घोडावत
पॉलीटेक्नीकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने तीन दिवसीय
लघुउद्योग व्यवसाय उभारणी विविध योजना अनुदान मार्गदर्शन ऑनलाईन राज्यस्तरीय
कार्यशाळेचे आयोजन दि. २६ एप्रिल ते २८
एप्रिल २०२१ या कालावधीत करण्यात आले होते. ही कार्यशाळा सलगर अमृततुल्य चहा यांनी
पुरस्कृत कली होती. या कार्यशाळेसाठी
महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन
युवक युवतीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. या कार्यशाळेचे पहिल्या दिवसाचे प्रमुख
मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ.ए.एम.गुरव, यांनी
लघुउद्योग व्यवसाय, विविध उयोग संधीवर, लघुउद्योगा व्यवसायासाठी विविध योजनाची माहिती विविध संकल्पना स्पष्ट करून
केले. या कार्यशाळेचे उद्घाटन मा. विराट गिरी, प्राचार्य संजय घोडावत
पॉलीटेक्नीकच, अतिग्रे यांनी केले ते म्हणाले'' बेरोजगार
तरुणांच्या हाताला काम मिळावे व नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे उद्योजक कसे
व्हावे या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.'' दुसर्या दिवसाचे डिजिटल मार्केटिंग तंज्ञ प्रशिक्षक मा.
श्री. शशिकांत जामनेकर, यांनी आपला उद्योग डीजीटल करण्यासाठी आवश्यक बाबींची परिपूर्ण माहिती
दिली. यशस्वी उद्योजक श्री. दादू सलगर
यांनी आपली सकक्षेस स्टोरी मनमोहक शब्दात व्यक्त केली. तीस-या दिवसाचे मार्गदर्शक
मा. श्री. रवींद्र खैरे प्रसिद्ध व्यवसाय व लेखक, यांनी लघुउद्योग सुरु करण्याच्या प्रक्रिया, लघुउद्योग नोंदणी पद्धती आणि आवश्यक कागदपत्र,प्रकल्प आव्हाल तयार करणे पद्धती या प्रमुख घटकांवर
मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त मा. श्री विनायक भोसले यांनी
नवउद्योजकांसाठी किती संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचे सोन करून एक मोठा उद्योजक कसा
होता येईल असा उपस्थितांना कानमंत्र दिला. या कार्यशाळेविषयी बोलताना कौशल्य विकास
आणि उद्योजकता विभागाचे विभागप्रमुख प्रा. अजय कोंगे म्हणाले '' देशाची
गती उद्योगाच्या प्रगतीशिवाय शक्य नाही. म्हणून उद्योजक हा विकासाचा आधारस्तंभ
आहे. युवकयुवतींनी केवळ रोजगाराच्या मागे न लागता उद्योजक बनून रोजगाराची निमिर्ती
करावी. या करीता आपल्या नावीन्य कल्पकतेतून उद्योगाची निर्मिती करावी आणि त्याचा
विकासावर भर द्यावा हा उद्देश साध्य होण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
होते. कार्यशाळा आत्मसात करून जर कोणी आपला नवीन उद्योग सुरु केला तर खर्या
अर्थाने ही कार्यशाळा यशस्वी झाली असे समाधान आयोजन टीमला होईल. ई- प्रमाणपत्र व कौशल्य विकास आणि उद्योजकता
विभागांतर्गत उद्योग उभारणीसाठी आणि उद्योग आधार
मार्गदर्शन केले जाणार आहे. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ऑनलाईन सहकार्य
कॉम्प्युटर सायन्स विभागाचे विभागप्रमुख प्रा.सागर चव्हाण प्रा. अजय कोंगे,
प्रा.संदीप वाटेगावकर, डॉ. पुरुषोत्तम पेटारे, प्रा. कांतिलाल तमाचे, प्रा. किरण
साळुंखे यांनी अथक परिश्रम घेतले आहे. .या ऑनलाईन कार्यशाळेस संजय घोडावत विद्यापीठाचे
अध्यक्ष श्री. संजयजी घोडावत व विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.