Posts

Showing posts from August, 2026

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्न

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्न “पालकांचे स्वप्न करिअरच्या यशातून साकार करा” – विश्वस्त विनायक भोसले अतिग्रे : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘प्रारंभ २०२६’ हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दहावीनंतर अभियांत्रिकी शिक्षणाच्या नव्या पर्वात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेची शैक्षणिक संस्कृती, उपलब्ध सुविधा, करिअरच्या विविध संधी आणि भविष्यातील वाटचालीची दिशा समजावी, तसेच विद्यार्थी, पालक आणि संस्था यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट निकाल देणाऱ्या प्राध्यापकांच्या कार्याचेही कौतुक करून त्यांना  सन्मानित  करण्यात आले. या वेळी  कार्यक्रमाचे  अध्यक्ष  संजय घोडावत विद्यापीठाचे  विश्वस्त विनायक भोसले,  इन्स्टिट्यूटचे  संचालक डॉ. विराट गिरी, प्रथम वर्ष विभा...