संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संजय घोडावत विद्यापीठाच्या फुटबॉल मैदान परिसरात विद्यार्थी, प्राध्यापक, गार्डन विभागाचे प्रमुख तात्या देसाई आणि त्यांची टीम यांच्या सहकार्याने ३०० हून अधिक देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. भविष्यात हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त परिसर घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. विराट गिरी बोलताना म्हणाले, "पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. हीच भावी...