Posts

Showing posts from November, 2026

कष्टकऱ्यांचा तालुका अशी ओळख असलेला तालुका आता अधिकाऱ्यांचा म्हणून ओळखला जातो डॉ. अविनाश ढाकणे.

Image
कष्टकऱ्यांचा तालुका अशी ओळख असलेला तालुका आता अधिकाऱ्यांचा म्हणून ओळखला जातो  डॉ. अविनाश ढाकणे. पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) शैक्षणिक संस्थेमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या योगदानामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. सुमारे साठ वर्षांपूर्वी शिक्षण संस्था काढून तालुक्याच्या कल्याणाचा विचार ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व .बाबूजी आव्हाड यांनी केला त्यामुळेच मजुरांचा तालुका अशी ओळख असणारा तालुका आता अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जात आहे, असे मत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले.                        बाबूजी आव्हाड महाविद्यालय स्थापनेपासून गेल्या वर्षी पर्यंत संस्थेत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा महाविद्यालया मध्ये संपन्न झाला.  यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, श्री तीलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे, माजी प्राचार्य जी.बी. आघाव, डॉ. जी.पी. ढाकणे, सेवानिवृत्त प्राध्यापक मोहनराव बडदे, विष्णू बोरले, प्रा...