संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा उत्साहात निरोप समारंभ
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा उत्साहात निरोप समारंभ “सेफ्टी ऑफिसर म्हणजे अनेक कुटुंबांच्या सुरक्षिततेचा रक्षक” — विश्वस्त विनायक भोसले कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) या अभ्यासक्रमाची चाळीस विद्यार्थ्यांची बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमित्त संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले होते. इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात विश्वस्त, विनायक भोसले यांनी इंडस्ट्रियल सेफ्टी ऑफिसरच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “सेफ्टी ऑफिसर हा केवळ उद्योगातील कर्मचारी नसून अनेक कुटुंबांच्या सुरक्षिततेचा रक्षक असतो. उद्योगातील प्रत्येक जीव मौल्यवान आहे आणि त्यांचे संरक्षण करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळ...