Posts

Showing posts from July, 2023

"कौशल्य विकासातून लघुउद्योग निर्मिती"

Image
"कौशल्य विकासातून लघुउद्योग निर्मिती" मार्गदर्शन करण्याचा आजचा उत्तम योगायोग... स्वयंसिद्धा या संस्थेत आज "कौशल्य विकासातून लघुउद्योग निर्मिती" या विषयावर मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले. त्या निमित्ताने संस्थेतील कार्य महिलांनी निर्माण केलेले विविध लघु उद्योगयांची माहिती, संस्थेचे कामकाजाचे नियोजन आणि लोकहिताचे कार्य आज पाहण्यास अनुभवण्यास आणि समजून घेण्यास एक उत्तम संधी मला प्राप्त झाली. स्वयंसिद्धाची स्थापना १९९२ साली झाली. महिलांचे आर्थिक स्वावलंबन, सर्वांगीण विकास, क्षमता संवर्धनासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे. आई उद्योजिका बनली तर पुढची ‌पिढी उद्योजक बनेल, हा मंत्र घेऊन महिला संघटनाचे काम सुरू केले. यासाठी कुटुंबातील प्रमुख महिलेला, आईला छोटे, मोठे व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन, मार्गदर्शन दिले. कोल्हापूर जिल्हातील स्वयंसिद्धा संस्था गेल्या पंचवीस वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहेत. संस्थेच्या विश्वस्त, संचालिका कांचन परूळेकर यांचा पुढाकाराने आत्तापर्यंत महिला स्वावलंबनाचे विविध उपक्रम राबवण्यात आले असून, या माध्यमातून ४५० उद्योज...