राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका: डॉ. विराट गिरी

संजय घोडावत विद्यापीठ येथे मुख्याध्यापकांचे ६० वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेल उत्साहात संपन्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका: डॉ. विराट गिरी जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दोन दिवसीय निवासी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळ पुणे अधिवेशन २०२३ मुख्याध्यापकांचे ६० वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनामध्ये प्रमुख वक्ते मा. डॉ. विराट गिरी प्राचार्य, संजय घोडावत इन्स्टिट्यूट हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. डॉ. गिरी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित माध्यमिक मुख्याध्यापकाच्या समोर मांडताना प्रथमता मुख्याध्यापकांची व्याख्या सांगून सुरुवात केली. 'शिक्षकाचे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक होय' ३४ वर्षानंतर आणि २१ व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा २०२० मध्ये करण्यात आली. २९ जुलै, २०२० रोजी विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने नव...