राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका: डॉ. विराट गिरी

 


संजय घोडावत विद्यापीठ येथे मुख्याध्यापकांचे ६० वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेल उत्साहात संपन्न

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका:  डॉ. विराट गिरी


 जयसिंगपूर :  संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दोन दिवसीय निवासी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळ पुणे अधिवेशन २०२३  मुख्याध्यापकांचे ६० वे  राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनामध्ये प्रमुख वक्ते मा. डॉ. विराट गिरी प्राचार्य, संजय घोडावत इन्स्टिट्यूट  हे  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.

डॉ. गिरी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित माध्यमिक मुख्याध्यापकाच्या समोर मांडताना प्रथमता मुख्याध्यापकांची व्याख्या सांगून सुरुवात केली. 'शिक्षकाचे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक होय'

 
३४ वर्षानंतर आणि २१ व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा २०२० मध्ये करण्यात आली. २९ जुलै, २०२० रोजी विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली. या शैक्षणिक धोरणाचा  सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी  आनंदाने स्वीकार करून ते समजून घेणे आवश्यक आहे.

१९६८, १९८६, १९९२ या  शैक्षणिक धोरणात झालेले वेळोवेळी बदल आणि त्यांचा इतिहास याविषयी मार्गदर्शन करून.
 नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामधील व्हिजन आणि मिशन, महत्त्वाचे मुद्दे, शैक्षणिक करिकुलम स्पष्ट केले.  या धोरणातील महत्त्वाचा बदल शिकणे आणि शिकवणे, अभ्यासात महत्त्वाचे घटक, भारतीय मूल्य जोपासून गोबलाइज शिक्षण पद्धतीत महत्त्वाचे मुद्दे, नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमात समाविष्ट करून शिक्षण घेणारी नवीन पिढी कौशल्य विकसित होऊन सक्षम भारताचे नागरिक तयार होतील या उद्देशाने या शैक्षणिक धोरणाचे महत्त्व उपस्थित मुख्याध्यापक  शिक्षकांना समजावून सांगितले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दिष्ट हे  भारताला जागतिक ज्ञान महासत्ता” बनविणे हे आहे.

सर्व स्तरावर अनुभवात्मक शिक्षणाचा अवलंब केला जाईल ज्यात प्रत्येक विषयामध्ये मानांक अध्यापन म्हणून प्रात्यक्षिक शिक्षण कला आणि खेळ यांचा समावेश असेल शिक्षण कथाकथन आधारित अध्यापन इत्यादी सह वेगवेगळ्या विषयांमधील सहसंबंध शोधण्याचाही समावेश या शिक्षण धोरणामध्ये असेल शैक्षणिक निष्पत्तीमध्ये आढळून येणारी तफावत दूर करण्यासाठी वर्गातील व्यवहार कार्यक्षमतेवर आधारित अध्ययन आणि शिक्षणाानुसार चालतील मूल्यांकन साधने देखील शिक्षणाच्या रूपात मूल्यांकन व्यवहार ज्ञान उपजीविका भागवता येईल.  असे कौशल्य या शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले हे शैक्षणिक धोरण आहे.  या शैक्षणिक धोरणाचा आपण सर्वांनी स्वीकार करून दिलेल्या मुद्द्यानुसार अध्यापन करण्याची तयारी शिक्षकांनी करावी असा कान मंत्र डॉ. गिरी यांनी दिला .
मुख्याध्यापक शिक्षकांनी निर्माण केलेल्या प्रश्नाला अचूक आणि मुद्देसूद उत्तर डॉ. गिरी यांनी देऊन सर्वच उपस्थित शिक्षकांमध्ये  शैक्षणिक धोरणाविषयी एक पॉझिटिव्ह एनर्जी  निर्माण केली होती.

या सत्रातील  कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री वसंतराव पाटील, माजी अध्यक्ष संयुक्त महामंडळ. प्रमुख उपस्थिती:  श्री संजय शिपकर, श्री देविदास उमाटे, श्री कांचन महाजन श्री जालिंदर पैठणे,  महाराष्ट्र राज्यातून आलेले मुख्याध्यापक  उपस्थित होते.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)