Posts

Showing posts from 2024

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Image
 संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न  कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि सीबी कोरा ग्रामोद्योग संस्था बोरवली यांच्या सयुक्त विद्यमाने “स्वयंरोजगार आत्मनिर्भर, उद्योजकता विकास, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमास मार्गदर्शक श्री. उमाकांत डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध खादी आणि ग्रामोद्योग संस्थेच्या योजनांची माहिती लघुउद्योग निर्मिती त्यासाठी आवश्यक शासनाचे साह्य पीटीए कौशल्य विकास प्रशिक्षण आणि विविध कोर्स विषयी उपस्तीताना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी इन्स्टिट्यूट मध्ये सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि सीबी कोरा ग्रामोद्योग आयोगा अंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासाचे सुरु असलेले  विविध प्रशिक्षण,  प्रशिक्षणाची निवड करण्याची पद्धती, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रावर मिळणार...

व्यवस्थित फोटो क्लिक करण्यासाठी काही महत्त्वाचे मंत्र प्रा. अजय बी. कोंगे

Image
व्यवस्थित आणि आकर्षक फोटो क्लिक करण्यासाठी काही महत्त्वाचे मंत्र: प्रकाशाचा वापर करा: फोटो काढताना योग्य प्रकाश महत्वाचा असतो. नैसर्गिक प्रकाश किंवा सौम्य कृत्रिम प्रकाश वापरा. छायाचित्र काढताना प्रकाशाच्या दिशेचा विचार करा. कॅमेरा स्थिर ठेवा: फोटो काढताना कॅमेरा स्थिर ठेवा. हँडशेक टाळण्यासाठी त्रिपॉड वापरणे किंवा हाताच्या स्थिरतेवर लक्ष द्या. फोकस ठरवा: कोणावर किंवा कायवर फोकस करायचं हे ठरवा. मुख्य विषय स्पष्ट असावा. किंवा दृश्याचा समतोल साधा: तुमचा फ्रेम एका साध्या आणि आकर्षक दृश्यासाठी व्यवस्थित ठेवा. अनुपात (rule of thirds) वापरणे हे एक चांगले तंत्र आहे. समोरे आलेली रेषा वापरा: वळणं, रेषा किंवा वाळूतील दृष्य असू शकते, याचा उपयोग तुम्ही एक ठोस रचना निर्माण करण्यासाठी करू शकता. दूरदर्शन करा: शक्यतो, साधे आणि अव्यवस्थित पार्श्वभूमी टाळा. फोटोमध्ये खूप गोष्टी नसाव्यात, त्यामुळे मुख्य विषय पुढे येईल. कॅमेरा सेटिंग्ज समजून घ्या: आपल्या कॅमेराच्या सेटिंग्ज समजून घ्या. ISO, शटर स्पीड आणि अॅपर्चर यांसारखी सेटिंग्ज योग्यरित्या समजून घ्या, जेणेकरून अधिक...

अकरा मारुती दर्शन धार्मिक तीर्थयात्रा प्रा. अजय बी. कोंगे

Image
"संत रामदास स्वामी यांनी स्थापना केलेले केलेले अकरा मारुती दर्शन" हे एक  विशेष हिंदू धर्मासाठी धार्मिक देवदर्शन आहे. "अकरा मारुती" म्हणजेच हनुमानाचे ११ विविध रूपे किंवा त्यांचे ११ विविध मंदिरे. ह्या ११ रूपांचे दर्शन घेणे हे भक्तांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक कार्य मानले जाते.  "अकरा मारुती दर्शन" म्हणजे एक विशिष्ट धार्मिक परंपरा आहे, ज्यामध्ये भक्त विविध ठिकाणी व विविध रूपांत भगवान हनुमानाचे दर्शन घेतात. महाराष्ट्रात "अकरा मारुती" दर्शनाला मोठे महत्त्व आहे, आणि हे दर्शन अनेक ठिकाणी, विशेषतः सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाणी हे मंदिर आहेत.  या दर्शनाच्या माध्यमातून भक्तांना हनुमानजीच्या कृपेची प्राप्ती होईल असे मानले जाते, आणि त्यांचे जीवन संकटमुक्त व समृद्ध होईल अशी श्रद्धा आहे.

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न

Image
संजय घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने  (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी  'फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी' विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याचा  उद्देश नव शैक्षणिक धोरण 2020 ची  परिणामकारक अंमलबजावणी करणे हा होता.     या कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांना वर्गात अभ्यासामध्ये गुंतवून ठेवण्यासाठीच्या नव संकल्पना शिकून घेतल्या. त्यासाठी विविध व्युह-रचना आखल्या. त्यासाठी 'फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी' पद्धतीचा वापर कसा करावा याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. नाविन्यपूर्ण अध्यापन- अध्ययन प्रणाली राबवण्यासाठी, मूल्यांकन पद्धतीसाठी माहिती आणि तंत्रज्ञान साधनांचा प्रभावीपणे वापर कसा करावा याचे देखील प्रशिक्षण घेतले.    या कार्यशाळेत नव शैक्षणिक धोरण मसुदा समिती सदस्या व एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रो. डॉ. वसुधा कामत, याच विद्यापीठाच्या एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रो.डॉ.जयश्री शिंदे, सोमय्या कॉलेज मुंबईच्या अनु...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था-२०२४” या पुरस्काराने सन्मानित.

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था-२०२४”  या पुरस्काराने सन्मानित  कोल्हापूर : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या २०२४ वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटला शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल 'एज्युकेशन वर्ल्ड' संस्थेमार्फत “इलेस्ट इमर्जिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट” (उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था)२०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी हा पुरस्कार मा. श्री. सौरभ अग्रवाल, सचिव, राजस्थान सरकार यांच्या हस्ते स्वीकारला आहे.  या प्रसंगी बोलताना संचालक, डॉ. गिरी म्हणाले, "विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा मनाचा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकांचे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित...