Posts

Showing posts from September, 2024

व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्या ध्येयांशी सुसंगत लोकांसोबत राहण्याचे महत्त्व :

Image
आपल्या ध्येयांशी सुसंगत लोकांसोबत राहण्याचे महत्त्व : व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्या आयुष्यात कोणत्या व्यक्तींचा प्रभाव आहे, त्याचा आपल्यावर आणि आपल्या यशावर मोठा परिणाम होतो. आपली मूल्ये, ध्येये आणि विचारसरणी ज्या व्यक्तींशी जुळतात, अशा व्यक्तींचा सहवास असणे आपल्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मोठी प्रगती साधायला मदत करतो. ज्या वातावरणात आपण असतो, ते आपल्यावर परिणाम करतं. म्हणून, जर आपण अशा व्यक्तींसोबत राहिलो ज्यांच्या मूल्यांमध्ये आणि ध्येयांमध्ये प्रामाणिकपणा आणि सुसंवाद आहे, तर आपलं जीवन अधिक सकारात्मक आणि यशस्वी होतं. सत्यता आणि पाठिंब्याच्या वातावरणात राहणे हे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यात महत्त्वाचे आहे. अशा व्यक्ती आपल्याला प्रोत्साहन देतात, योग्य मार्गदर्शन करतात आणि गरज पडल्यास आपल्याला खंबीरपणे आधार देतात. त्यांच्यासोबत असलेल्या नात्यांमुळे आपण आपल्या ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो आणि कोणत्याही अडथळ्यांना सामोरे जाण्याची मानसिक क्षमता प्राप्त करतो. खोट्या लोकांपासून दूर राहण्याचे फायदे : आपल्या आयुष्यातील खोट्या, असत्य व्यक्ती आपल्या सकारात्मकतेवर आणि उ...

आई आणि नवरी मुलगी

Image
असं म्हणतात मुलीच्या लग्नात आईने मंगलाष्टक ऐकू नये. कारण ते सुर मन हळवं करतात. जी मुलगी लहानाची मोठी होते, खेळते, बागडते तिच जेंव्हा सासुरवाशीण व्हायला निघते तेंव्हा त्या मुलीला देखील माहेरचे पाश सोडणं अवघड असतं. एक उंबरठा ओलांडून दुसऱ्या घरात प्रवेश करताना ती देखील कावरीबावरी होते. पण जेंव्हा झालं हा विधी करण्याची वेळ येते तेंव्हा कोणतीच आई आपला हुंदका आवरु शकत नाही. व.पु. म्हणतात तसं, " सासरी मुलगी सजवली जाते,रुजवली जात नाही.." हे लिहिण्याचे कारण म्हणजे, आपल्याकडे लग्नात ' विहिण..' म्हणण्याची पद्धत आहे. ही विहीण म्हणजे मुलीची आई, मुलाच्या आईला माझी मुलगी तुमच्या पदरात घालते आहे, तिचा सांभाळ करावा ही केली जाणारी विनंती म्हणजे विहिण.. मुलीची पाठवणी करताना डोळे का पाणावतात माहित आहे? कारण, तिने घरात घालवलेले क्षण डोळ्यासमोर येतात आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे ती आता परक्याचे धन झाले आहे हे सुचित करते. मग या भावना शब्दांत व्यक्त करणे सोपे असते? पण तरीही एका आईचं हृदय हे समजण्यासाठी आई होणं गरजेचं असतं. म्हणून तर व.पु. म्हणतात, " भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कम...

डॉ. संभाजी पवार यांना जागतिक संशोधनात मानाचे स्थान - संजय घोडावत विद्यापीठाची मोठी झेप

Image
डॉ. संभाजी पवार यांना जागतिक संशोधनात मानाचे स्थान - संजय घोडावत विद्यापीठाची मोठी झेप अतिग्रे :अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील आघाडीच्या २% संशोधकांच्या यादीत संजय घोडावत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संभाजी पवार यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, डॉ. पवार यांनी २०२० पासून सलग पाच वर्षे, हे स्थान कायम राखले आहे. या प्रतिष्ठेच्या यशामुळे संजय घोडावत विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर अधिक उजळले आहे.         डॉ. पवार यांनी आधुनिक पदार्थ विज्ञान आणि अ‍ॅप्लाइड फिजिक्स  या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी आतापर्यंत १५० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले असून, जागतिक पातळीवरील ३०४,७३८ संशोधकांमध्ये ३०४१वा क्रमांक मिळवला आहे. हे त्यांच्या कर्तृत्वाचे आणि अथक परिश्रमांचे प्रतीक आहे.       याव्यतिरिक्त, भारत सरकारकडून डॉ.पवार यांना एक विशेष प्रकल्प मिळाला आहे, ज्यात कार्बन डाय-ऑक्साइडचे इंधन (इथेनॉल, मिथेनॉल) तयार करण्यासाठी वापर करण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे जागतिक ऊर्जा संकटावर मा...

NGO

एक गैर-सरकारी संस्था, किंवा एनजीओ, सामान्यत: सार्वजनिक किंवा सामाजिक कल्याणाच्या उद्दिष्टांसाठी कार्य करण्यासाठी स्थापन केली जाते . उदाहरणार्थ, एनजीओ मानवी हक्क, मतदारांचे हक्क, आरोग्यसेवा, गरिबांना मदत करणे आणि प्राण्यांवरील क्रूरता रोखणे यावर लक्ष केंद्रित करू शकते. स्वयंसेवी संस्थांना देणग्या आणि अनुदानाद्वारे निधी दिला जाऊ शकतो. या संस्था सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी, मानवतावादी मदत पुरवण्यासाठी, विकसनशील समुदायांसाठी आणि जगभरातील लोकसंख्येच्या हक्क आणि कल्याणासाठी समर्थन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. एक गैर-सरकारी संस्था (NGO) सरकार आणि सामान्य जनता यांच्यातील संपर्क म्हणून काम करते . जेव्हा काही समस्या सरकारपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांचे निराकरण केले जात नाही, तेव्हा या समस्या सरकारला सोपवण्यात एनजीओ कार्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. एनजीओ खाजगी देणग्यांपासून सदस्यत्व देयांपर्यंत सरकारी योगदानापर्यंत विविध निधी स्रोतांवर अवलंबून असतात. सामाजिक कार्य करू इच्छित आहेत ?? तर स्वतःची Section 8 NGO नोंदनी करा आणि मिळवा फंडिंग असिस्टंट . या माध्...

शिक्षक आणि अशैक्षणिक कामकाज

Image
शिक्षक आणि अशैक्षणिक कामकाज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या अगतिकतेचे जळजळीत वास्तव आपण सर्वांनी वाचावे. समाजातील एक जबाबदार घटक म्हणून शैक्षणिक धोरण आणि शाळेतील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनापासून वंचितच नव्हे तर बालकांपासून दूर ठेवणारी यंत्रणा.. या सर्व घटकांना जाब प्रत्येकाने विचारलाच पाहिजे.       स्वतःच्या नावापुढे  शिक्षकीपणाचं लेबल लावलेल्या, नेमकं काय चाललयं या संभ्रमात असलेल्या प्रत्येक शिक्षकाला पडलेला हा भाबडा प्रश्न 'हू आय अँम ? कोण आहे मी ? आचारी, रंगारी, कारकुन, टपाल्या की अजून कुणी ? लेकरांकडे डोळेझाक करत सगळी शक्ती मोबाईलच्या स्क्रिनवर पणाला लावणारा टेक्नोसेव्ही योद्धा की आणखी कुणी? विद्यार्थी सोडून इतरत्र केंद्रीत झालेल्या कुचकामी शिक्षण पद्धतीच्या चक्रव्युहात अडकलेला अभिमन्यू म्हणजे शिक्षक. एक शिकवणं सोडलं तर इतर कामातच व्यग्र असणार्‍या भारताच्या भावी आधारस्तंभांचा आत्ताचा स्वतःच सैरभैर झालेला आधारस्तंभ म्हणजे शिक्षक. गेल्या दहा बारा वर्षांपासून तो शिक्षकच न रहावा इतपत त्याच्या भूमिकेत झालेला; किंबहूना सक्तीने घडवून आणलेला...

इंजिनिअरिंग अभ्यास करताना 'नव संकल्पनाचा ध्यास' घ्या- श्री. विनायक भोसले

Image
इंजिनिअरिंग अभ्यास करताना 'नव संकल्पनाचा ध्यास' घ्या- श्री. विनायक भोसले घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष डिग्री इंजिनिअरिंग आणि शॉर्ट-टर्म कोर्सेस "प्रारंभ २०२४" कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न SGI : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये प्रथम वर्ष डिग्री इंजिनिअरिंग आणि एमएसबीटीई मान्यताप्राप्त  शॉर्ट-टर्म अभ्यासक्रमाचा “प्रारंभ २०२४” कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले व पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.  यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे  डायरेक्टर डॉ. विराट व्ही. गिरी, प्रथम वर्ष डिग्री इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल थिकने, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेसचे विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे, इंजिनिअरिंग विभागाचे सर्व विभाग प्रमुख, डिप्लोमा इंजीनियरिंगचे विभाग प्रमुख,कार्यक्रम समन्वयक प्रा. विनायक पावटे, प्रा. रजनी अतिग्रे, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वप्निल थिकने यांनी केले. डायरेक्टर डॉ. विराट गिरी यांनी उपस्...

संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रा.विद्याराणी खोत यांना पीएचडी

Image
प्रा.विद्याराणी खोत यांना पीएचडी अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठाकडून फार्मासूटिकल सायन्स मध्ये प्रा.विद्याराणी खोत यांना पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली.''फार्माकोलॉजिकल इव्हॅल्युएशन ऑफ सिलेक्टेड इंडियन मेडिसिनल प्लांट्स फॉर हेमेटोलॉजिकल पॅरामिटर्स, ट्रान्सफेरिन लेव्हल्स अँड जनरल डेबिलिटी इन लॅबोरेटरी अनिमल्स" हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. यासाठी स्कूल ऑफ फार्मासूटिकल सायन्सेस चे संचालक डॉ. सुभाष कुंभार यांनी मार्गदर्शन केले. प्रा.खोत घोडावत विद्यापीठात डी.फार्म विभागाच्या प्रमुख आहेत.       संस्थेचे चेअरमन संजय घोडावत, सचिव श्रेणीक घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. एन.के.पाटील, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डीन डॉ.व्ही.व्ही कुलकर्णी, रिसर्च डीन डॉ. ए.डी सावंत,रिसर्च डिरेक्टर डॉ.संभाजी पवार,विभाग प्रमुख डॉ.जीवन लवंडे यांनी अभिनंदन केले आहे.

सिप्लाच्या उपाध्यक्षांची घोडावत विद्यापीठास भेट सेंटर फॉर एक्सलन्स साठी प्रस्ताव

सिप्लाच्या उपाध्यक्षांची घोडावत विद्यापीठास भेट  सेंटर फॉर एक्सलन्स साठी प्रस्ताव अतिग्रे : कंपनी क्वालिटी अफेयर्स चे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव आसगेकर यांनी नुकतीच घोडावत विद्यापीठास भेट दिली.यावेळी विद्यापीठाकडून सेंटर फॉर एक्सलन्स साठी प्रस्ताव ठेवण्यात आला. यासाठी सिप्ला कंपनीच्या प्रमुखांबरोबर सकारात्मक चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी कुलसचिव डॉ. विवेक कायंदे ,विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे डीन डॉ. विवेक कुलकर्णी, औषध निर्माण शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुभाष कुंभार, विज्ञान व अलाइड हेल्थ सायन्सेस विभागाचे संचालक डॉ. आनंद सावंत, प्रशिक्षण व प्लेसमेंटचे संचालक डॉ. नितिन पुजारी, विभागाचे प्रमुख डॉ. स्वप्निल हिरीकुडे,बी. फार्मसी विभागप्रमुख डॉ. जीवन लव्हांडे, डी. फार्म विभागप्रमुख,डॉ. विद्याराणी खोत, टीपीओ समन्वयक प्रा. सुरज पाटील उपस्थीत होते. शैक्षणिक समन्वयक अश्विनी चकोते यांनी आसगेकर यांचे स्वागत केले.        यावेळी  फार्मसी  इमारतीतील अत्याधुनिक सुविधा, प्रयोगशाळा, आणि शैक्षणिक डिजिटल साधने  पाहिली. त्यांनी शिक्षकांशी संवाद साधून सिप...

वृक्षारोपण काळाची गरज आणि केलेले कार्य अभ्यास करण्याचा विषय

Image
ब्राझीलमध्ये, या जोडप्याने १८ वर्षांत २ दशलक्ष झाडे लावली, १७२ पक्ष्यांच्या प्रजाती, ३३ सस्तन प्राणी, १५ उभयचर प्राणी, १५ सरपटणारे प्राणी आणि २९३ वनस्पती प्रजाती परत केल्या.  संपूर्ण जगाने त्यांना ओळखले पाहिजे.  हे लेलिया वॅनिक आणि सॅबॅस्टिओ सालगाडो आहेत. या जोडप्याने टेरा इन्स्टिट्यूट ही एक छोटी संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला ज्याने २ दशलक्ष रोपे लावली आणि जंगलाचे पुनरुज्जीवन केले.  "कार्बन डाय ऑक्साईडला ऑक्सिजनमध्ये रूपांतरित करू शकणारा एकच प्राणी आहे, आणि ते म्हणजे एक झाड. "आम्हाला जंगलांची पुनर्रोपण करणे आवश्यक आहे." केवळ स्थानिक वनस्पतींचा वापर करून, जोडप्याने संपूर्ण परिसंस्थेची सुरवातीपासून पुनर्बांधणी केली आणि परिसराची लक्षणीय भरभराट झाली, ज्यामुळे जीवजंतू परत येऊ लागले; त्यांच्या कार्याबद्दल धन्यवाद, लेलिया आणि सेबॅस्टिओने डझनभर धोक्यात असलेल्या प्रजाती वाचवल्या. "माझ्याप्रमाणे पृथ्वी दुःखी होती, सर्व काही नष्ट झाले होते. मग माझ्या पत्नीला हे जंगल पुनर्रोपण करण्याची एक विलक्षण कल्पना आली: सर्व कीटक, मासे आणि पक्षी परत आले आणि झाडांच्या नवीन व...

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि आयटीआय अभ्यासक्रम 'प्रारंभ २०२४' या कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Image
  घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि आयटीआय अभ्यासक्रम 'प्रारंभ २०२४' या  कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यातआली.   संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये  प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी आणि आय टी आय  "प्रारंभ-२०२४" या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले, पालक प्रतिनिधी  यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. या वेळी इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट व्ही.  गिरी, बेसिक सायन्स विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. प्रशांत पाटील, आयटीआय प्राचार्य, प्रा. स्वप्निल ठीकने सर्व विभागाचे विभाग मुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. विनीत जाखलेकर , प्रा. पूजा पाटील हे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत पाटील यांनी केले.  इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक आणि आयटीआयच्या सर्व विभागाचे प्रवेश 100% झालेले स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश निश्चित केल्याबद्दल सर्वांचे शब...