Posts

Showing posts from December, 2025

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये क्रीडा महोत्सव २०२५–२६ चे जल्लोषात उद्घाटन

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये क्रीडा महोत्सव २०२५–२६ चे जल्लोषात उद्घाटन कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये क्रीडा महोत्सव २०२५–२६ चे उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते नारळ वाढवून  उत्साहात करण्यात आले. या वेळी इन्स्टिट्यूट मधील सर्व विभागांचे विभाग प्रमुख, क्रीडा समन्वयक प्रा. संदीप पाटील, प्रा.सौ. प्राजक्ता विभुते, विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी श्रेयश   जाधव, कु. तन्मय उमाजे, विविध विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना डॉ. विराट गिरी यांनी शैक्षणिक इंजिनिअरिंग अध्यापनासोबतच क्रीडा महोत्सवाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्र अत्यंत आवश्यक असून खेळामुळे शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि मानसिक शारीरिक तंदुरुस्ती विकसित होते, असे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबत खेळाचे संतुलन राखल्यास विद्यार्थी जीवनात यशस्वी ठरतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सांघिक आणि वैयक्तिक खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये विजयी ठरणाऱ्या ...

संजय घोडावत विद्यापीठात “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी संपन्न

Image
  आयआयटी बॉम्बे येथील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. सीबी राज बी.पल्लई यांचे स्वागत करताना  कुलगुरू  डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे,  डॉ. व्ही व्ही कुलकर्णी. संजय घोडावत विद्यापीठात “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी संपन्न कोल्हापूर :  संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दि. १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला देशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. परिषदेचे मुख्य वक्ते भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी बॉम्बे) येथील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. सीबी राज बी.पल्लई हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून आधुनिक तंत्रज्ञानातील नव्या घडामोडी, संशोधनातील उदयोन्मुख प्रवाह तसेच उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले.         यावेळी कुलगुरू  डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, ...

विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा प्रभावी उपक्रमाचे आयोजन

Image
  विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा प्रभावी उपक्रमाचे आयोजन                                                                                                                                                                   कोल्हापूर अतिग्रे  प्रतिनिधी : तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैलीची जाणीव निर्माण करत समाजासाठी ...

इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच टेरिटोरियल आर्मीमधून पास आऊट होणारी पहिली महिला लेफ्टनंट सई जाधव यांचा संजय घोडावत शैक्षणिक संकुलात सन्मानपूर्वक गौरव

Image
इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या  ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच टेरिटोरियल आर्मीमधून पास आऊट होणारी  पहिली महिला लेफ्टनंट सई जाधव यांचा संजय घोडावत शैक्षणिक संकुलात सन्मानपूर्वक गौरव कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची कन्या व जयसिंगपूर येथील रहिवासी लेफ्टनंट सई जाधव यांनी टेरिटोरियल आर्मीमध्ये (प्रादेशिक सेना) नियुक्त होताना 'आयएमए' मधून पास होणाऱ्या  पहिल्या महिला लेफ्टनंट बनण्याचा मान मिळवून इतिहास घडवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी यशाबद्दल संजय घोडावत एज्युकेशन कॅम्पसच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संजय घोडावत एज्युकेशन कॅम्पसचे चेअरमन संजय घोडावत यांनी लेफ्टनंट सई जाधव यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “सई जाधव यांचे यश हे केवळ वैयक्तिक नसून कोल्हापूर, महाराष्ट्र व देशातील तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. देशसेवा, महिला सक्षमीकरण आणि युवकांना प्रेरणा देणारा आदर्श त्यांच्या वाटचालीतून निर्माण झाला आहे.” सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट सई जाधव म्हणाल्या, “संजय घोडावत शैक्षणिक संकुलाने दिलेल्या सन्मानाबद्दल मी मनापासून आभ...

संजय घोडावत विद्यापीठात ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध

Image
संजय घोडावत विद्यापीठात ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेते व समाजसेवक नटसम्राट नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना विचारांची नवी दिशा दिली. कार्यक्रमाची सुरुवात नाना पाटेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विजयचंद घोडावत, राजेश घोडावत, राकेश घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका मोहंती मॅडम, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, अकॅडमी डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी प्रशांत कुलकर्णी आणि पंकज मेहता यांच्या ‘शब्द पंख’ प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रस्ताविकात चेअरमन संजय घ...

संजय घोडावत विद्यापीठात नाना पाटेकर यांची भेट विद्यार्थ्यांसोबत साधणार संवाद

Image
संजय घोडावत विद्यापीठात नाना पाटेकर यांची भेट विद्यार्थ्यांसोबत साधणार संवाद कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पर्व तयार झाले आहे. येत्या १७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रख्यात अभिनेते, समाजसेवक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहणारे व्यक्तिमत्त्व नाना पाटेकर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रसारमाध्यमांना दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिष्ठित व्यक्तींच्या संवादमालिका आयोजित करण्याची परंपरा संजय घोडावत विद्यापीठामध्ये सातत्याने जपली आहे. त्या परंपरेत आणखी एक मोलाची भर म्हणून नाना पाटेकर यांचे मार्गदर्शन ठरणार आहे. साधेपणा, संवेदनशीलता आणि समाजाशी असलेल्या सखोल नात्यामुळे नाना पाटेकर हे तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत मानले जातात. त्यामुळे त्यांचा संवाद विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाना पाटेकर यांच्या "एक व्यक्तिमत्व, अनेक पैलू" या जीवनतत्त्वज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन...

करिअर निवडताना उद्दिष्ट निश्चित करा डॉ. विराट गिरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये स्कूल कनेक्ट कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद करिअर निवडताना उद्दिष्ट निश्चित करा  डॉ. विराट गिरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अतिग्रे, कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “स्कूल कनेक्ट करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला” विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील ७,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटला भेट देत तांत्रिक शिक्षणाच्या विविध संधींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या मार्गदर्शन सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना म्हटले की, “दहावी-बारावीनंतर करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम स्वतःची उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत. उद्दिष्ट नसलेल्या प्रवासाला दिशा नसते. रोजगार निर्माण करणे किंवा स्वतःचा उद्योग उभारणे हे स्वप्न साकार करण्यासाठी एमएसबीटीइ  नेमून दिलेले अभ्यासक्रम विद्या...

शेतीपूरक जोड व्यवसाय : आधुनिक, टिकाऊ आणि भविष्यातील संधी

Image
शेतीपूरक जोड व्यवसाय : आधुनिक, टिकाऊ आणि भविष्यातील संधी प्रा. अजय बी. कोंगे विभाग प्रमुख, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे, कोल्हापूर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती आणि शेतकरी. परंतु बदलत्या हवामानाचा परिणाम, उत्पादन खर्चात वाढ, बाजारातील अनिश्चितता आणि जमिनीची तुकडेबंदी यामुळे केवळ शेतीवर अवलंबून राहणे धोकादायक ठरत आहे. आजच्या काळात शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी शेतीपूरक जोड व्यवसायाकडे वळणे अत्यंत आवश्यक झाले आहे. शेती सोबत करता येणारे अनेक व्यवसाय आहेत जे कमी गुंतवणुकीत, कमी जोखमीमध्ये आणि लवकर परतावा देणारे आहेत. हे जोड व्यवसाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवतात, जमिनीचे उत्पादनशीलता सुधारतात आणि कुटुंबातील तरुणांसाठी रोजगार निर्माण करतात. १. दुग्ध व्यवसाय : शेतकऱ्यांचा सर्वात सुरक्षित पर्याय दुग्ध व्यवसाय हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जिव्हाळ्याचा व्यवसाय आहे. शेतीसोबत हा व्यवसाय सहज जुळतो. शेतात उपलब्ध हिरवा व सुका चारा, पेंढा, कृषी अवशेष यांचा उपयोग गुरांसाठी होतो. सध्या भरीव अनुदानित योजनांमुळे शेतकऱ...