
संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामध्ये बार्टी पुरस्कृत एम.सी.ई.डी मार्फत मोफत “ हायटेक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम ” कोल्हापूर , ता. 29 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे , पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर अंतर्गत दोन महिने कालावधीचा नि:शुल्क अनिवासी हायटेक उद्योजकता विकास प्रशिक्षण "आयटी ऑटोमेशन प्रोग्रामिंग आणि बेसिक जपानीज." संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग साह्य कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग अंतर्गत कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील इच्छुक युवक युवतीने कडून प्राप्त होणाऱ्या प्रवेश अर्जा मधून दोन महिने कालावधीच्या मोफत अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र 30 उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे. तरी अनुसूचित जाती स्वयंसहायता गटातील स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीने आपले आधार कार्ड , जातीचे प्रमाणपत्र ,...