संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये “कौशल्य विकास आणि शासकीय योजना, प्रशिक्षण कार्यक्रम” मार्गदर्शन व परिचय
संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये “कौशल्य
विकास आणि शासकीय योजना, प्रशिक्षण कार्यक्रम” मार्गदर्शन व परिचय मेळावा.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विविध मार्गदर्शन कार्यक्रम संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्ग आयोजित शासकीय योजनातील प्रशिक्षण, कोर्सेस, कार्यशाळा, माहिती, जाणीवजागृती, मार्गदर्शन कार्यक्रम (सप्ताह ) दिनांक २५/०७/२०२२ ते ३०/०७/२०२२ या कालावधी मध्ये प्रशिक्षणा बाबत माहिती, मार्गदर्शन व प्रवेश अर्ज स्विकारण्यासाठी ६ दिवशीय परिचय कार्यक्रम संजय घोडावत युनिव्हर्सिटी कॅम्पस कोल्हापूर सांगली हायवे अतिग्रे ४१६११८ जिल्हा कोल्हापूर. येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास उपस्थित व इच्छुकांना विविध
तांत्रिक अभ्यासक्रम सीएनसी अँड व्हीएमसी ऑपरेटर, फौंड्री टेक्नॉलॉजी, वेल्डिंग
असिस्टंट, ऑटोकॅड डिझायनर, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, सोलार टीव्ही
इन्स्टॉलर, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, जीएसटी अकाउंट असिस्टंट. यासह सॉफ्ट
स्किल्स व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजकता विकास कौशल्ये, जीवन कौशल्ये, इंग्रजी
संप्रेषण कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, संगणक-तंत्रज्ञान
कौशल्य, आरोग्य आणि
जागरूकता, नोकरी मुलाखत कौशल्ये, नेतृत्व कौशल्ये, टीमवर्क
कौशल्ये., नव उद्योजकास शासकीय योजना आणि प्रशिक्षण नवीन उद्योग
व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘स्टार्टअप’ 'मुद्रा योजना', मुख्यमंत्री
रोजगार निर्मित कार्यक्रम, एम.एस.एम.ई., यासारख्या विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन तसेच राज्यस्तरीय
कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम (एम.एस.एम.ई. प्रमाणपत्रसह) कॉम्प्युटर
हार्डवेअर नेटवर्किंग, सोलर एनर्जी, पीएलसी प्रोग्रामिंग, अकाउंटिंग
बँकिंग अवरेनेस, ऑटोट्रॉनिक्सची मूलभूत तत्त्वे. कार्सेस करीता नोंदणी केलेल्या
प्रत्येक कोर्सेससाठी ३० पात्र उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात
येणार आहे. या सोबतच केंद्र
व राज्य शासन आयोजित कौशल्य विकास योजना कोर्सेस माहित व मार्गदर्शन,कौशल्य भारत, स्टार्टअप इंडिया,
स्टँडअप इंडिया, मेकइन इंडिया, माहिती व मार्गदर्शन, जिल्हा उद्योग केंद्र,एमसीईडी पुरस्कृत तांत्रिक कौशल्य आणि
उद्योजकता विकास विद्यावेतनासह प्रशिक्षण, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
भारतसरकार उद्योगआधार माहिती आणि मार्गदर्शन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती
कार्यक्रम, उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम, बार्टी, विविध संवर्गातील बीज भांडवल माहिती आणि
मार्गदर्शन. विभागाचे प्रमुख समन्वयक, प्रा. अजय बी. कोंगे करणार आहेत. कोल्हापूर –
सांगली जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार
युवक युवतींनी या प्रशिक्षण मार्गदर्शन
संधीचा फायदा करून आपले जीवनमान कौशल्य विकसित करावे असे आव्हान , प्रा. विराट
गिरी प्राचार्य, संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे यांनी केले आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष मा. श्री संजयजी घोडावत व
विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.