संजय घोडावत यांना यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान

संजय घोडावत यांना यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान जयसिंगपूर :आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या 35 व्या पुणे फेस्टिवल मध्ये उद्योगपती संजय घोडावत यांना उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 22 सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंडळ रंगमंच येथे राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन,पुणे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे फेस्टिवल चे अध्यक्ष माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी खा. श्रीरंग बारणे खा.रजनी पाटील खा.हेमामालिनी उपस्थित होत्या.कला,क्रीडा,उद्योग, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आतापर्यंत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संजय घोडावत म्हणाले, की या मानाच्या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल आयोजकांचा मी खूप आभारी आहे.तसेच घोडावत उद्योग समूहाकडून सामाजिक, शैक्षणिक,उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रात व देशात अखंडित कार्य सुरू राहील. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू....