राज्यपाल रमेशकुमार बैस यांच्या हस्ते विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांना ‘सिंघानिया एक्सलंस पुरस्कार २०२३’ सन्मानपूर्वक प्रधान




 राज्यपाल रमेशकुमार बैस यांच्या हस्ते विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांना ‘सिंघानिया एक्सलंस पुरस्कार २०२३’ सन्मानपूर्वक प्रधान



प्रा. अजय बी. कोंगे  ब्लॉग – 

संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले यांना शनिवार दि २ सप्टेंबर रोजी राजभवन मुंबई येथे  महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री रमेशकुमार बैस यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘सिंघानिया एक्सलंस अवार्ड २०२३’ सन्मानपूर्वक प्राप्त झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट  मॅनेजमेंटबद्दल दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात मुंबई येथील राजभवनामध्ये पार पडला. या सन्मान सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. श्री. दीपक केसरकर, सिंघानिया ग्रुपचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. 

   या पुरस्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री. विनायक भोसले म्हणाले, “संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये केजी टू पीजी 17000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे सर्वोच्च दर्जाचे, नवोपक्रमशील शिक्षण दिले जाते. या संकुलातील सर्व शैक्षणिक विभागांचे उत्कृष्ट मॅनेजमेंट, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी या सर्व गोष्टींमुळे हा अॅवार्ड प्राप्त झाला आहे. संस्थापक श्री संजय घोडावत, यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व घोडावत शिक्षण संकुलातील सर्व विभागप्रमुखांच्या सहकार्यामुळे मला हा ‘सिंघानिया एक्सलंस अॅवार्ड २०२३’ प्राप्त झाला आहे.   

 संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये सीबीएसई, सीआयई, आय बी बोर्डचे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. बोर्डिंग, डे बोर्डिंग स्कूलची व्यवस्था, प्रशस्त शैक्षणिक परिसर, अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त शाळेची इमारत, विविध खेळांची मैदाने, अत्याधुनिक ग्रंथालय, प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, उच्चशिक्षित शिक्षक, अध्ययनपूरक वातावरण, नवोपक्रम, नवतंत्रज्ञान या सर्वामुळे संजय घोडावत शिक्षण संकुलाचा नावलौकिक भारतातच नव्हे तर भारताबाहेरही पसरला आहे. या सर्व विभागाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांना उत्कृष्ट मॅनेजमेंटबद्दल हा अॅवार्ड प्राप्त झाल्यामुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.


Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)