संजय घोडावत शैक्षणिक ट्रस्ट कडून स्वप्नील कुसाळेला पाच लाखांचे बक्षीस जाहीर


 



 संजय घोडावत शैक्षणिक ट्रस्ट कडून स्वप्नील कुसाळेला पाच लाखांचे बक्षीस जाहीर 

अतिग्रे: पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे ने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला कांस्य पदक जिंकून दिले. 1952 नंतर महाराष्ट्रात पदक खेचून आणणाऱ्या स्वप्नील ला संजय घोडावत शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.अध्यक्ष संजय घोडावत यांनी ही घोषणा केली.

 कला,क्रीडा,साहित्य,संशोधन,उद्योग, समाज सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा नेहमीच संजय घोडावत शैक्षणिक ट्रस्ट सन्मान करत आला आहे. यासाठी दरवर्षी एस जी यु आयकॉन अवॉर्ड दिला जातो. 

    तसेच संजय घोडावत सोशल फाउंडेशन द्वारे आजवर अंध अपंग शाळा, पूरग्रस्त,अनाथालय, दुष्काळग्रस्त शेतकरी,वृद्धाश्रम, शहीद जवानांचे कुटुंब, आरोग्य केंद्र, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपले आहे. कोरोना काळात देखील रुग्णांची मनोभावे सेवा केली आहे. फाउंडेशन द्वारे सौजन्याची वारी आली आपल्या दारी हा उपक्रम राबवून गरजूंना तातडीची मदत दिली जाते.


     संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी,टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिला संजय घोडावत यांच्याकडून सर्वतोपरी मदत देण्यात आली आहे. त्यामुळे आज ऐश्वर्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत आहे. भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार व संजय घोडावत विद्यापीठाची विद्यार्थिनी स्मृती मानधना हिला देखील सहाय्य केले जाते. तसेच इंडियन कबड्डी लीग मध्ये निवड झालेल्या विद्यापीठाच्या खेळाडूंना मदतीचा हात देण्यात आला आहे. तसेच ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, पॅराऑलिंपिकपटू मानसी जोशी, एव्हरेस्ट वीरांगना कस्तुरी सावेकर यांना देखील सहाय्य केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून खेळाला प्रोत्साहन दिले आहे.

       स्वप्निल कुसाळे मायदेशी परतल्यानंतर घोडावत विद्यापीठात सन्मानपूर्वक 5 लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात येईल अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली आहे.

       या यशाबद्दल सेक्रेटरी श्रेणीक घोडावत, कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,प्राचार्य डॉ. विराट गिरी, प्राचार्या सस्मिता मोहंती, श्री वासू सर यांनी अभिनंदन केले आहे.


चौकट- संजय घोडावत : स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्यपदक जिंकून देशाचा व महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. कोल्हापूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्याचे मनापासून अभिनंदन.



Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)