Posts

Showing posts from October, 2025

माहितीचा अधिकार कायदा @2005

माहितीचा अधिकार कायदा @2005 निष्प्रभ झालेला कायदा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर' घटना समितीने प्रदीर्घ विचारांती भारतात लोकशाही प्रजासत्ताक राजवट स्थापन करण्याचा १९५० साली निर्णय घेतला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. प्रजा ही राजा. आणि मग शासनात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकच हुद्दा प्रदान करण्यात आला, तो म्हणजे शासकीय सेवक. म्हणजे प्रजारूपी राजाचे सेवक! दुर्दैवाने प्रत्यक्षात मात्र गेल्या ७५ वर्षात शासनात काम करणारे सेवक झाले राजे आणि प्रजासत्ताकातील राजा म्हणवणारी प्रजा झाली सेवक अशी परिस्थिती निर्माण झाली. १९२३ चा ब्रिटिशांनी आणलेला शासकीय गोपनीयता कायदा रद्द झालाच नाही. किंबहुना, त्याचा ब्रिटिशांपेक्षा जास्त प्रभावी वापर करून शासकीय सेवक प्रजारूपी मालकापासून माहिती दडवू लागले. १९७५ पासून सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये दिलेल्या निकालांमध्ये ‘माहितीचा अधिकार’ हा नागरिकांचा घटनादत्त मूलभूत अधिकार असल्याचे नमूद करत ‘माहिती अधिकार कायदा’ तातडीने तयार करण्याच्या सूचना सरकारला केल्या. अरुणा रॉय यांच्यापासून अण्णा हजारे यांच्यापर्यंत असंख्य सामाजिक कार्यकर...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे  राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय  यश "ईअँडटीसी विभागातील “टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स” ने जिंकले कॅनसॅट चॅलेंजमधील राष्ट्रीय विजेतेपद! कोल्हापूर (प्रतिनिधी): त्रिवेंद्रम (केरळ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIST) या प्रतिष्ठित संस्थेत नुकतीच पार पडलेली कॉन्सेंशिया २०२५ ही भव्य राष्ट्रीयस्तरीय तांत्रिक स्पर्धा संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी ऐतिहासिक ठरली आहे. या स्पर्धेत संजय घोडावत इन्स्टिट्यूट (एसजीआय)* च्या ई अँड टी सी विभागातील “टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स” या विद्यार्थ्यांच्या चमूने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील तेरा नामांकित अभियांत्रिकी संस्थांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी पुणे), एमआयटी-डब्ल्यूपीयू पुणे आणि व्हीआयटी चेन्नई यांसारख्या अग्रगण्य संस्थांचा समावेश होता. या कठीण आणि अत्यंत स्पर्धात्मक परिक्षेत एसजीआयचा संघ एकमेव असा ठरला, ज्...

"शाळेत शिक्षकांनी मुलांना फटकारले किंवा मारहाण केली तर पालकांना वाईट वाटू नये. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की शाळेत मुलाला मारहाण करणे हे शेवटी पोलिसांकडून मारहाण होण्यापेक्षा चांगले आहे,"

Image
“शिस्त, शिक्षण आणि समाज – एक नवा विचार” "शाळेत शिक्षकांनी मुलांना फटकारले किंवा मारहाण केली तर पालकांना वाईट वाटू नये. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की शाळेत मुलाला मारहाण करणे हे शेवटी पोलिसांकडून मारहाण होण्यापेक्षा चांगले आहे," ✍️ लेखक : प्रा. अजय बी. कोंगे (शिक्षण, मानसशास्त्रीय समुपदेशक) प्रस्तावना “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः” असे आपले शतकानुशतकांचे तत्त्वज्ञान आहे. गुरू म्हणजेच शिस्त, ज्ञान, मूल्ये आणि संस्कारांचे मूर्तिमंत प्रतीक. परंतु, आजच्या समाजात हीच शिस्त, हेच संस्कार आणि हा आदर हरवत चाललेला दिसतो. शाळेत शिक्षकांनी मुलाला फटकारले किंवा शिस्त लावली तर पालकांच्या मनात लगेच नाराजी उमटते. पण त्याच मुलाने पुढे चुकीचे वर्तन केले तर समाज, पोलिस आणि न्यायव्यवस्था त्याला जाब विचारतात. आजची खरी शोकांतिका अशी आहे की – 👉 शिस्त हरवली, 👉 शिक्षणाचे मूल्य कमी झाले, 👉 पालकांचे नियंत्रण ढासळले, 👉 आणि समाज स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढू लागला. ही परिस्थिती बदलायची असेल तर पालक, शिक्षक, समाज आणि प्रशासन या सर्वांनी आपली भू...