संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड
संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड कोल्हापूर (अतिग्रे) : संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे पुणे येथील नामांकित औद्योगिक समूह “स्पार्क मिंडा” यांच्या वतीने नुकताच आयोजित करण्यात आलेला कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ११ इंजिनिअरिंग महाविद्यालय चे एकूण ४१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ५१ विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी व मुलाखती अंतर्गत अंतिम निवड केली. या कॅम्पस ड्राइव्हमध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे १७ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली असून त्यात यांत्रिकी अभियांत्रिकीचे १०, विद्युत अभियांत्रिकीचे ६ आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीचा १ विद्यार्थी समाविष्ट आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि. १५ जून २०२६ रोजी कंपनीत रुजू होण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २.४ लाख प्रतिवर्ष असे आकर्षक वेतन पॅकेज देण्यात येणार आहे. या यशस्वी कॅम्पस ड्राइव्हसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे प्रमुख प्रा. आशिष पाटील...