दूरदृष्टीचा शिक्षणयोद्धा : डॉ. विराट वसंतराव गिरी
डॉ. विराट गिरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा
दूरदृष्टीचा शिक्षणयोद्धा : डॉ. विराट वसंतराव गिरी
आजच्या स्पर्धात्मक, तंत्रज्ञानप्रधान आणि झपाट्याने बदलणाऱ्या शिक्षणविश्वात केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे पुरेसे ठरत नाही; तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित नेतृत्व, दूरदृष्टी आणि संवेदनशील मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. अशा काळात संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील संचालक डॉ. विराट वसंतराव गिरी हे आधुनिक शिक्षणप्रवाहातील एक प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ठळकपणे समोर येतात. डॉ. गिरी यांची शैक्षणिक वाटचाल हीच त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारी आहे. डीसीओ, बी.ई. (आयटी), एम.टेक (कंप्युटर) आणि व्हीटीयू बेळगावी येथून पीएच.डी. अशी भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेल्या डॉ. गिरी यांनी शिक्षणाकडे केवळ पदवी किंवा नोकरी मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता, व्यक्तिमत्त्व घडवण्याची आणि समाज घडवण्याची प्रक्रिया म्हणून पाहिले आहे. आजवर त्यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांतील संधी व आव्हाने, अध्यापन-अभ्यास कौशल्ये, नवीन शैक्षणिक धोरण २०२०, ओबीई प्रक्रिया, नैतिक शिक्षण, औद्योगिक व प्रशासकीय कौशल्ये तसेच पालक-विद्यार्थी नाते या विषयांवर हजारहून अधिक प्रेरणादायी व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य विद्यार्थ्यांना योग्य दिशा, आत्मविश्वास आणि स्पष्ट ध्येय मिळाले आहे. संशोधन व लेखन क्षेत्रातही डॉ. गिरी यांचे योगदान उल्लेखनीय आहे. शिक्षण व करिअर विकासावर आधारित ९ पुस्तके, नामांकित वृत्तपत्रांतील लेख, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतील १२ संशोधन निबंध आणि २ पेटंट्स ही त्यांच्या संशोधनशील वृत्तीची साक्ष आहे. संजय घोडावत विद्यापीठाचे नोंदणीकृत पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून ते सध्या दोन संशोधकांचे मार्गदर्शन करत असून संशोधन संस्कृती रुजवण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. नवोदय विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळख मिळवलेल्या डॉ. गिरी यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘जलरत्न पुरस्कार’, ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ तसेच आयएसटीई कडून ‘बेस्ट पॉलिटेक्निक’ असे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली संजय घोडावत इन्स्टिट्यूटने अल्प कालावधीत एनबीए मान्यता मिळवून राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली, हे त्यांच्या कार्यक्षम प्रशासकीय कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी ही डॉ. गिरी यांच्या नेतृत्वाची ओळख आहे. करिअर फेअर, वृक्षारोपण व संवर्धन, रक्तदान, रस्ते सुरक्षा, वैद्यकीय शिबिरे, आपत्ती निवारण तसेच अनाथालये व वृद्धाश्रमांसाठी केलेले कार्य त्यांच्या संवेदनशील आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाचे दर्शन घडवते. डॉ. विराट गिरी यांचे नेतृत्व हे केवळ आदेशात्मक नसून संवादप्रधान, प्रेरणादायी आणि विद्यार्थीकेंद्री आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करून शिस्त आणि आपुलकी यांचा सुंदर समतोल त्यांनी जपला आहे. विद्यार्थ्यांनी केवळ यशस्वी व्यावसायिक नव्हे, तर जबाबदार नागरिक व्हावे, हा त्यांचा ठाम आग्रह संस्थेच्या प्रत्येक उपक्रमातून प्रतिबिंबित होतो. शिक्षणातून समाजघडण आणि विद्यार्थ्यांतून राष्ट्रनिर्मिती हा ध्यास बाळगणारे डॉ. विराट वसंतराव गिरी हे आजच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ आहेत. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली संजय घोडावत इन्स्टिट्यूट भविष्यातही गुणवत्ता, मूल्ये आणि नवोन्मेष यांची नवी उंची गाठेल, यात शंका नाही. डॉ. विराट गिरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा
शब्दांकन : प्रा. अजय बबनराव कोंगे ,विभाग प्रमुख, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर
