तांत्रिक कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम 2019-2020



“महाराष्ट्र शासन जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर” पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर आयोजित संजय घोडावत विद्यापीठाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामध्ये फौंड्री टेक्नॉलॉजी, सीएनसी अँड व्हीएमसी ऑपरेटिंग या कोर्सेस चे प्रशिक्षण यशस्वीरीत्या घेण्यात आले .




























“महाराष्ट्र शासन जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर” पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर आयोजित संजय घोडावत विद्यापीठाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामध्ये फौंड्री टेक्नॉलॉजी, सीएनसी अँड व्हीएमसी ऑपरेटिंग या कोर्सेस चे प्रशिक्षण यशस्वीरीत्या घेण्यात आले .या तांत्रिक कौशल्य उद्योजकता प्रशिक्षण सर्वसाधारण व विशेष प्रवर्गातील प्रत्येक प्रशिक्षणार्थीना रुपये 2000/- विद्यावेतनासह मोफत दोन महिने ०३ /०९ /२०१९  ते ०५ /११ /२०१९ या कालावधीमध्ये ५७ प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तांत्रिक कौशल्यांची थेरी, प्रक्टिकल आणि उद्योजकता  व उद्योजकीय  गुणसंपदा,  उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास,  इंग्रजी भाषेचा व्यवहारात उपयोग,  संभाषण कौशल्ये, वेळेचे व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, प्रेरणात्मक  मार्गदर्शन, संगणक ज्ञान, जीवन कौशल्य, आरोग्य  व पर्यावरण शिक्षण,  विविध कंपन्यांना भेटी,  मुलाखत कौशल्य, उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदतीचे मार्गदर्शन, शासनाच्या मुद्रा योजनाचे  मार्गदर्शन या प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.ए.रायकर म्हणाले ''तांत्रिक कौशल्ये जीवनाला वेगळी दिशा देण्याचे काम करते. कौशल्याशिवाय अभियांत्रिकी क्षेत्रात पर्याय नाही. इंडस्ट्री मध्ये आज कुशल कामगार मिळत नाहीत ही फार मोठी खंत आहे. त्यामुळे तांत्रिक कौशल्य हे रोजगार मिळवून देण्याचे उत्तम साधन बनले आहे.''
यावेळी प्रशिक्षणार्थीनीही आपले मनोगत व्यक्त केले
या प्रशिक्षण कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले,  कुलगुरू डॉ. व्ही.ए. रायकर, कुलसचिव डॉ. बी .एम हिर्डेकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूरचे  प्रकल्प अधिकारी श्री.राजशेखर शिंदे, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉ.एम टी तेलसंग, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.कपाले, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.ए.बी.कोंगे, एमसीइडीचे सचिन कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. भविष्यात लागणाऱ्या जीवन कौशल्याचे मार्गदर्शन प्रा.संदीप वाटेगावकर ,प्रा.सोहन तिवडे, एच आर विभाग प्रमुख श्री.अमित निंबाळकर, प्रा.मकरंद जोशी यांनी केले.  याचबरोबर प्रा.पी.बी.गवळी , प्रा. एच टी. शिंदे , श्री.एम .डी. तोरस्कर, श्री. ए. बी. नाईक , श्री. व्ही एल. फासके,  श्री. डी. ए. कोळके  यांनी तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले.
या उपक्रमाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)