प्रा. ए. बी. कोंगे यांना ''राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरव'' पुरस्कार प्रदान २०१९


घोडावत विद्यापीठाच्या प्रा. अजय कोंगे यांना ''राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरव'' पुरस्कार प्रदान





  •  या पुरस्काराबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत, विश्वस्त श्री.विनायक भोसले, कुलगुरु डॉ.व्ही.ए.रायकर, कुलसचिव डॉ.बी.एम.हिर्डेकर, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉ.एम.टी.तेलसंग यांनी प्रा.अजय कोंगे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




या राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण निवड आणि कार्यक्रम पत्रिका 





















  • राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटक प्रा.ए.बी.कोंगे यांच्या हस्ते करण्यात आले.


विजया लक्ष्मी सोशल फौंडेशन आणि शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टबेळगाव यांच्याकडून  राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरव





 पुरस्काराचे वितरण शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा.विक्रम वसंत शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. अजय कोंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रा.शिक्षिका सौ. रोहिणी कोंगे चिरंजीव विवेक, कन्या  तनिष्का  यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी साहित्यिका शैलजा कुलकर्णी, अभिनेत्री सौ.पदमजा खटावकर, कविवर्य प्रा.सुजय देसाई  व आदी मान्यवर उपस्थित




  • संजय घोडावत विद्यापीठाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय बबनराव कोंगे यांना विजया लक्ष्मी सोशल फौंडेशन आणि शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टबेळगाव यांच्याकडून  राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात या पुरस्काराची मिडिया माध्यमाने दिलेली प्रसिद्ध







घोडावत विद्यापीठाच्या प्रा. अजय कोंगे यांना ''राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरव'' पुरस्कार प्रदान

 कोल्हापूर,प्रतिनिधी:
संजय घोडावत विद्यापीठाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय बबनराव कोंगे यांना विजया लक्ष्मी सोशल फौंडेशन आणि शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेळगाव यांच्याकडून  राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरवपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा.विक्रम वसंत शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. अजय कोंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रा.शिक्षिका सौ रोहिणी कोंगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी साहित्यिका शैलजा कुलकर्णी, अभिनेत्री सौ.पदमजा खटावकर, कविवर्य प्रा.सुजय देसाई  व आदी मान्यवर उपस्थित होते.
या राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटक प्रा.ए.बी.कोंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
        प्रा. अजय कोंगे हे केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास लोकोपयोगी योजनांचे विद्यापीठ स्तरावर प्रमुख समन्वयक म्हणून  काम पाहत आहेत. त्यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना, महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांना विविध सरकारच्या लोकोपयोगी कौशल्य विकास आणि उद्योजकता  कोर्सेसचे शासकीय योजनातून मोफत  विद्यावेतनासह प्रशिक्षण देऊन नोकरी व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे.   महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान,  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,  दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना मार्गदर्शन,  केंद्र शासनाचे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनाचे प्रशिक्षण कर्यक्रम,  प्रधानमंत्री ग्रामीण डीजीटल साक्षरता अभियानाचे  मार्गदर्शन, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय कार्यशाळाचे आयोजन करून  इ-कन्टेन्ट डेव्हलपमेंट ,ऑडिओ व्हिडिओ निर्मिती,  कॉम्प्युटर  हार्डवेअर, एथिकल हॅकिंग कार्यशाळा,  मुद्रायोजना आणि त्याचे सुशिक्षीत बेरोजगारसाठी माहिती आणि मार्गदर्शन,  जीवन जगण्यासाठी आवश्यक  असणारी कौशल्ये,  संभाषण कौशल्ये, उद्योजकता व उद्योजकीय गुणसंपदा, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास,  इंग्रजी भाषेचे प्रभुत्व,  वेळेचे व्यवस्थापन , प्रेरणात्मक  मार्गदर्शन, संगणक ज्ञान, जीवन कौशल्ये,  आरोग्य व पर्यावरण शिक्षण, मुलाखत तंत्र व्यवस्थापन, विविध कंपन्यांनातील कुशल कामगाराचा अभ्यास, शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांना माहिती अधिकार २००५ माहिती आणि  मार्गदर्शन, उद्योजकता उभारणीसाठी आर्थिक मदतीचे मार्गदर्शन, शासनाच्या बीजभांडवल महामंडळाची माहिती आणि मार्गदर्शन  प्रा.अजय कोंगे  आपल्या व्याख्यानाद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील  सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना, महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. शैक्षणिक, सामाजिक आणि शासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा.कोंगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आधीही त्यांना महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयतर्फे '' सोशल मीडिया महामित्र'' या विधायक कार्याबद्दल गौरव करण्यात आला होता.

प्रा.कोंगे यांनी अध्यापक विद्यालयात १५ वर्षे अध्यापन केले आहे. त्यांनी उत्तम दर्जाचे शिक्षक तयार केले आहेत.कौशल्य व उद्योजकता विभागामार्फत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करून काहींना उद्योजक बनविले आहे.
 या गौरवाबद्दल प्रा. कोंगे म्हणाले '' या पुरस्कारामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण आणि कार्यक्रमात आणखी जबाबदारी वाढली असून इथुन पुढे जास्तीत जास्त वंचित विविध संवर्गातील सुशिक्षत बेरोजगार युवक युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना कौशल्य विकसित करू असे बोलून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रा. कोंगे यांचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी येथे पूर्ण केले  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  पाथर्डी येथील एम.एम. निऱ्हाळी महाविद्यालय, पुढे त्यांनी पदवी, पदव्युत्तर शिक्षण तसेच एम.एड. पर्यंतचे शिक्षण  पुणे विद्यापीठातून पूर्ण केले.
या पुरस्काराबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत, विश्वस्त श्री.विनायक भोसले, कुलगुरु डॉ.व्ही.ए.रायकर, कुलसचिव डॉ.बी.एम.हिर्डेकर, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉ.एम.टी.तेलसंग यांनी प्रा.अजय कोंगे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)