Posts

Showing posts from October, 2024

Counselor

Image
  समुपदेशन म्हणजे काय   ? अमेरिकन कौन्सिलिंग असोसिएशन एक्सटर्नल लिंक:ओपन _ इन _ न्यू (एसीए) नुसार , व्यावसायिक समुपदेशन ही व्यक्तींशी संबंध निर्माण करण्याची प्रक्रिया आहे जी त्यांना मानसिक आरोग्य आणि निरोगीपणा , शिक्षण आणि करिअरची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सक्षम करते. हे समुपदेशक आणि त्यांचे ग्राहक यांच्यातील सहयोगी संबंध आहे. व्यावसायिक समुपदेशन खालीलप्रमाणे असू शकते: वैयक्तिक समुपदेशन हा समुपदेशनाचा सर्वात सामान्य प्रकार आहे जो एखाद्या व्यक्तीच्या वाढीवर आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो. जोडपे किंवा विवाह समुपदेशन जोडप्यांना संघर्षावर मात करण्यासाठी आणि मजबूत नातेसंबंधासाठी कार्य करण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते. कौटुंबिक समुपदेशनामध्ये भिन्न कौटुंबिक गतिशीलता आणि त्यांचा कौटुंबिक रचनेवर कसा परिणाम होतो याचा समावेश असतो. गट समुपदेशन म्हणजे गट संवादाचा वापर वाढीस सुलभ करण्यासाठी.   समुपदेशन म्हणजे काय ? तुम्ही करिअर म्हणून समुपदेशनाचा विचार करत असल्यास , समुपदेशकाच्या भूमिका , अपेक्षा आणि जबाबदाऱ्या समजून घेणे महत्त्वाचे आहे. अमेरिकन समुपदेशन असोसिएश...

अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलचा किताब

Image
अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलचा किताब कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत 'एज्युकेशन वर्ल्ड' संस्थेमार्फत महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील डे कम बोर्डिंग विभागातील नंबर वन स्कूलचा किताब मिळवला आहे. दिल्ली-गुडगाव येथे झालेल्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या श्रीमती सस्मिता मोहंती यांच्या नेतृत्वाखालील उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की, "प्राचार्या मोहंती यांच्या कुशल व्यवस्थापनामुळेच शाळेला हा गौरव मिळाला आहे." या प्रसंगी बोलताना श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उ...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

Image
संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई येथे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ कन्नन गिरीश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शर्मा उपस्थित होते.          घोडावत यांनी पश्चिम महाराष्ट्र व बेळगाव येथे शैक्षणिक संकुलाची निर्मिती केली आहे. केजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण इथे घेता येते.येथील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. उत्कृष्ट प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. आहेत. संजय घोडावत विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस व वैश...

पंकजाताई गोपिनाथ मुंढे दसरा मेळावा २०२४

Image
ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची जन्मभूमी, भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथे दरवर्षीच्या परंपरेनुसार ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला. यंदाही मेळाव्यास विराट जनसगर उसळला होता. या जनसमुदायासमोर नतमस्तक होऊन उपस्थितांना अभिवादन केले. तत्पूर्वी संत श्री. भगवान बाबांची विधिवत पूजा आणि आरती करून बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. मी दरवर्षी दसरा मेळाव्याला आपल्या सर्वांना साष्टांग नमस्कार घालते. कारण मुंडे साहेबांनी तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकली आहे. मी विजयी झाल्यावर तुम्ही सर्वांनी मला मोठा मान दिला. परंतु पराभव झाल्यानंतर तुम्ही लोकांनी त्यापेक्षा अधिक सन्मान मला दिला आहे. आता तुम्हा सर्वांना मान देण्यासाठी गावागावात आणि महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात दौरा करणार आहे. या मंचावर अठरा पगड जातींचे आणि समोर सर्व धर्माचे लोक आले आहेत. संत भगवान बाबांनी ज्या कारणासाठी गड उभारला ते कारण विसरून कधीही राजकारण करणार नाही. मी आजपर्यंत कधी जातीपातीच राजकारण केले नाही. डाग पडू नये याची काळजी घेत सत्व आणि तत्व जपूनच माझं राजकारण राहील असा विश्वास याप्रसंगी उपस्थितांना दिला. ...

माहितीचा अधिकार कायदा 2005

Image
आज १२ ऑक्टोबर, माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला त्याला १७ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने "सकाळ" मधे प्रसिद्ध झालेला Vivek Velankar सरांचा लेख. माहिती अधिकार कायद्याच्या अस्त्राला ग्रहण  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर' घटना समितीने प्रदीर्घ विचारांती भारतात लोकशाही प्रजासत्ताक राजवट स्थापन करण्याचा १९५० साली  निर्णय घेतला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. प्रजा ही राजा. आणि मग शासनात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकच हुद्दा प्रदान करण्यात आला, तो म्हणजे शासकीय सेवक. म्हणजे प्रजारूपी राजाचे सेवक! दुर्दैवाने प्रत्यक्षात मात्र गेल्या ७५ वर्षात  शासनात काम करणारे सेवक झाले राजे आणि प्रजासत्ताकातील राजा म्हणवणारी प्रजा झाली सेवक अशी परिस्थिती निर्माण झाली. १९२३ चा ब्रिटिशांनी आणलेला शासकीय गोपनीयता कायदा रद्द झालाच नाही. किंबहुना, त्याचा ब्रिटिशांपेक्षा जास्त प्रभावी वापर करून शासकीय सेवक प्रजारूपी मालकापासून माहिती दडवू लागले. १९७५ पासून सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये दिलेल्या निकालांमध्ये ‘माहितीचा अधिकार’ हा नागरिकांचा घटनादत्त मू...

महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती योजना माहिती आणि मार्गदर्शन

Image

महाराष्ट्र शासन कौशल्य विकास योजना माहिती आणि मार्गदर्शन

Image

सन्माननीय आदरणीय रतनजी टाटा यांना भावपूर्ण आदरांजली

Image
सन्माननीय आदरणीय रतनजी टाटा यांना भावपूर्ण आदरांजली उपभोगशून्य स्वामी! टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख सन्माननीय रतन टाटा आज आपल्या मध्ये नाही आहेत.  *उद्याच्या समर्थ भारताची महत्त्वपूर्ण समृद्ध औद्योगिक आणि मूल्यात्मक धूरा आता धारातीर्थी पडली आहे.* सन्माननीय आदरणीय रतनजी टाटा यांना भावपूर्ण आदरांजली बॉम्बे हाऊसमध्ये- म्हणजे टाटा समूहाचं मुंबईतलं मुख्यालय- इथं काम करणारे सांगतात- भारतातल्या सगळय़ात मोठय़ा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा जेव्हा या इमारतीत आपल्या कार्यालयात येण्यासाठी शिरतात.. तेव्हा काहीही वेगळं होत नाही! म्हणजे एरवी एखाद्या छोटय़ा-मोठय़ा उद्योगपतीच्या कार्यालयात त्याच्यासाठी स्वतंत्र लिफ्ट असते. तो यायच्या आधी त्याचे भालदार-चोपदार 'बाजू व्हा.. बाजू व्हा' असं म्हणत तिथे असलेल्या इतरांना उगाचच लहान वाटायला लावत असतात. पण रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये शिरतात तेव्हा यातलं काहीही होत नाही. त्यांची गाडी आली की पहिल्यांदा दारात बसलेल्या कुत्र्यांना आनंद होतो. आता एवढय़ा मोठय़ा उद्योगपतीच्या दारी कुत्रे असणं नवीन नाही. पण बॉम्बे हाऊसमधले कुत्रे म्हणजे खरे कुत्र...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “युवा संवाद” कार्यक्रम संपन्न संघर्षाला हसतमुखाने संघर्ष करण्याची तयारी ठेवा. श्री. अविनाश भारती

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “युवा संवाद” कार्यक्रम   संपन्न संघर्षाला हसतमुखाने संघर्ष करण्याची तयारी ठेवा. श्री . अविनाश भारती   कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने “ युवा संवाद” जाहीर व्याख्यान मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन   करण्यात आले होते.   प्रमुख मार्गदर्शक युवा व्याख्याते , कवी , झी टॉकीज फेम किर्तनकार. मा. श्री. अविनाश भारती , हे होते. यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे संचालक,   डॉ. विराट गिरी यांनी अविनाश भारती यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.   श्री अविनाश भारती यांनी जीवन कसे जगावे या विषयी अर्थ सांगून विविध उदाहरणे देऊन , जीवन जगताना संघर्ष आपल्याला आडवे येत   असून त्या संघर्षाला हसतमुखाने संघर्ष करण्याची तयारी युवा पिढीने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.   संघर्षाचे जिवंत उदाहरण मी स्वतः असून हॉटेलमध्ये वेटरचे   काम केलेलं असून आज तोच संघर्ष माझ्या उपयोगी पडला असून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. अंतरी भावना प्रबो...

अहमदनगर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार निर्मित कार्यक्रम

कोल्हापूर : सर्व ग्रामपंचायत मध्ये नल जल मित्रांची नियुक्ती जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम अहमदनगर – जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी-प्लंबर, मोटर मेकॅनिक- फिटर व इलेक्ट्रिशियन – पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन कौशल्य संचाची नल-जल मित्रांची नेमणूक केली जाणार आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्यरीतीने होण्यासाठी प्रति ग्रामपंचायत ३ नल-जल मित्र यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर तिन्ही पदांकरता प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे प्रति ग्रामपंचायत ९ उमेदवारांचे अर्ज ग्रामपंचायतीने अॅपवर भरायचे आहेत. राज्यस्तरावर ग्रामपंचायतीने भरलेल्या अर्जांमधून उमेदवारांची निवड करून त्यांना मोफत ...

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभ्यासिका

प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ‘एमआयटी एडीटी’चे पंख: डॉ. सुजित धर्मपात्रे कोल्हापूर (Competitive Exam)  : सध्याच्या युगात केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC) किंवा राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांसारख्या स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणे, म्हणजे मायाजाळात फसण्यासारखे समजले जाते. बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्पप्न उराशी बाळगुण, दरवर्षी लाखो विद्यार्थी कुठल्याही बॅकअप प्लॅनशिवाय स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करतात. त्यात, पदवीपासूनच स्पर्धापरिक्षांच्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अनेक प्रयत्नांनंतरही आलेले अपयश, वाढते वय या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो. ही समस्या ओळखूनच विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारी होणाच्या स्पप्नांना यशस्वीतेचे पंख लावण्याचा संकल्प (MIT ADT) एमआयटी एडीटी सारख्या अग्रगण्य विद्यापीठाने केला आहे, असे मत , एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे (SICS) संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे (Dr. Sujith Dharmapatre) यांनी व्यक्त केले. सारांश प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ‘एमआयटी एडीटी’चे पंख: डॉ. सुजित धर्मपात्रे सुसज्ज कॅम्पस व तज्ञांचे मार्गदर्श...