पंकजाताई गोपिनाथ मुंढे दसरा मेळावा २०२४


ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची जन्मभूमी, भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथे दरवर्षीच्या परंपरेनुसार ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला. यंदाही मेळाव्यास विराट जनसगर उसळला होता. या जनसमुदायासमोर नतमस्तक होऊन उपस्थितांना अभिवादन केले.

तत्पूर्वी संत श्री. भगवान बाबांची विधिवत पूजा आणि आरती करून बाबांच्या चरणी नतमस्तक झाले.

मी दरवर्षी दसरा मेळाव्याला आपल्या सर्वांना साष्टांग नमस्कार घालते. कारण मुंडे साहेबांनी तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकली आहे. मी विजयी झाल्यावर तुम्ही सर्वांनी मला मोठा मान दिला. परंतु पराभव झाल्यानंतर तुम्ही लोकांनी त्यापेक्षा अधिक सन्मान मला दिला आहे. आता तुम्हा सर्वांना मान देण्यासाठी गावागावात आणि महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात दौरा करणार आहे. या मंचावर अठरा पगड जातींचे आणि समोर सर्व धर्माचे लोक आले आहेत.

संत भगवान बाबांनी ज्या कारणासाठी गड उभारला ते कारण विसरून कधीही राजकारण करणार नाही. मी आजपर्यंत कधी जातीपातीच राजकारण केले नाही. डाग पडू नये याची काळजी घेत सत्व आणि तत्व जपूनच माझं राजकारण राहील असा विश्वास याप्रसंगी उपस्थितांना दिला.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)