Posts

Showing posts from January, 2025

आपले अहंकारी व्यक्तिमत्व नाही ना ?

आपले अहंकारी व्यक्तिमत्व नाही ना ? अहंकारी व्यक्तिमत्व म्हणजे, अशा प्रकारचे व्यक्तिमत्व ज्यामध्ये व्यक्ती आपल्या स्वभाव, उपलब्धी, किंवा स्थितीचा गर्व करतो आणि इतरांपेक्षा स्वतःला अधिक महत्त्वाचे आणि श्रेष्ठ समजते. अहंकार असलेल्या व्यक्तीला इतरांच्या भावना, विचार किंवा गरजा कधीच महत्त्वाच्या वाटत नाहीत. त्याला त्याचं विचार, कृती, आणि दृष्टिकोन इतरांपेक्षा सर्वोत्तम वाटतं. अहंकारी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींचे काही मुख्य गुण  दोष हे आहेत: 1.आत्ममग्नता (Self-centeredness): अहंकारी व्यक्ती हे नेहमीच आपल्याच विचारांमध्ये, इच्छांमध्ये आणि गरजांमध्ये हरवलेले असते. दुसऱ्यांचे विचार, भावना किंवा आवश्यकतांबद्दल त्यांना कमी कळतं किंवा ते दुर्लक्षित करतात. 2.दुसऱ्यांचा आदर न करणे (Lack of respect for others): अहंकार असलेल्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या किमतीची किंवा त्यांच्या योगदानाची किंमत नाही असते. ते स्वतःला दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ समजतात. 2.अवाजवी गर्व (Excessive pride): या व्यक्ती त्यांच्या उपलब्धी, सामाजिक स्थिती किंवा इतर गुणांवर गर्व करतात, आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या चुका दिसत ना...

व्यक्ती महत्त्व

Image
व्यक्तिमत्व: दुसऱ्याला सन्मान देणे हे एक उत्तम व्यक्तिमत्त्व दर्शवणारे लक्षण आहे. सन्मान देणारी व्यक्ती ही  सहानुभूतीशील, समजूतदार, आणि दयाळू असते. ती आपल्या शब्दांमध्ये आणि कृतींत दुसऱ्याच्या कर्तृत्वाचा आदर व्यक्त करत असते, आणि त्यामुळे केवळ इतरांच्या भावना जपण्यास मोठी मदत होते, ही व्यक्ती व्यक्तिमत्त्वाची आणि एकात्मतेचीही वृद्धी करत असते. अशा व्यक्तींचा आचारधर्म आणि वर्तणूक इतरांवर सकारात्मक परिणाम करणारी असते, आणि त्यामुळे  विश्वास, आदर आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होते. यामुळे इतर लोकांसोबत चांगले संबंध निर्माण होतात आणि समुदायात एकमेकांना मदतीचे हात  देण्यास सोपे होते. दुसऱ्यांना सन्मान देणारं व्यक्तिमत्व हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि आदर्श  गुण व्यक्तिमत्त्वाचा आहे. असं व्यक्तिमत्व  इतरांच्या भावना, विचार आणि दृष्टिकोनांची कदर करायला शिकवतं. 1. आदर आणि सौम्यता:  दुसऱ्यांच्या मतांचा आदर करणं आणि त्यांच्याशी नम्र व सन्मानपूर्वक वागणं. 2.समजून घेणं:  समोरच्या व्यक्तीच्या स्थितीला आणि भावनांना समजून घेत, त्यांचा आदर करणं. 3. सहानु...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा” संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा” संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा  कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता कवी, गझलकार, गीतकार ‘अपूर्व राजपूत’ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी  केले. यावेळी ग्रंथालय  विभाग प्रमुख सुनील नांदणीकर, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजपूत म्हणाले  महाविद्यालयीन शिक्षणासोबतच मातृभाषा “मराठीचे” जतन करणे काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये भाषाशैली आणि त्या भाषेचे महत्त्व आजच्या तरुण पिढीने समजून घेऊन त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणाबरोबरच भाषण कौशल्य काव्य कौशल्य आणि लेखन कौशल्य याविषयी महत्त्वाच्या टिप्स उपस्थित विद्यार्थ्यांना राजपूत यांनी देवून  त्यांच्या नावाजलेल्या  स्वरचित कवितांचे सादरीकरण केले त्या कवितां...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५  इन्स्टिट्यूटचे संचालक,  डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शना खाली नियोजनबद्ध आणि उत्साहात नुकत्याच संपन्न झाल्या आहे.   तीन दिवस चालेल्या या क्रीडा स्पर्धेत सर्व विभागाच्या सिव्हिल, कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल  विभागांच्या १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडाप्रकारात सहभाग नोंदवला. या  क्रीडा स्पर्धेचे प्रमुख समन्वयक प्रा. विनायक पावटे, प्रा. प्राजक्ता मलगे यांनी सामन्यांचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करून सर्व सामने शिस्तबद्ध पार पाडले.  या स्पर्धेत सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, लॅब असिस्टंट आणि ऑफिस बॉय यांचे मोलाचे सहकार्य लाभले. फुटबॉल विजेता संघ एस वाय मेकॅनिकल, उपविजेतासंघ एफवाय-टी वाय सिव्हिल, क्रिकेट विजेता एस वाय टी वाय कॉम्पुटर, उपविजेता एस वाय टी वाय इलेक्ट्रिकल, टग ऑफ वॉर विजेता एफवाय एसवायट...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये "सीएनसी प्रशिक्षण" कार्यक्रम संपन्न

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये "सीएनसी प्रशिक्षण" कार्यक्रम संपन्न कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांतर्गत "सीएनसी"  विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशिक्षक अभिजीत चौगुले, सुशांत मिसाळ, प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. महेश काळे, मेकॅनिकल विभागाचे  विभाग प्रमुख, प्रा. योगेश पोवार आणि विद्यार्थी उपस्थित होते.   संजय घोडावत इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल विभाग आणि स्टार इन्फोटेक इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करून 92 लाभार्थी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अवांतर कौशल्य प्रमाणपत्र रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यास वेळोवेळी महत्त्वाची मदत करत असता. जे विद्यार्थी शिक्षणाबरोबर इतर कौशल्य आत्मसात करतात त्या विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये एक विशिष्ट वाढ झालेली असते. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घ...

स्वामी विवेकानंद

Image
स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी १८६३ - ३९ जुलै १९०२) हे भारतीय योगी, संत आणि तत्त्वज्ञानी होते. ते वेदांत आणि योग शिक्षणाचे प्रचारक होते. स्वामी विवेकानंद यांचे कार्य भारतीय समाजाच्या आध्यात्मिक आणि बौद्धिक उन्नतीसाठी महत्त्वाचे मानले जाते. स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध भाषण १८९३ मध्ये शिकागोतील 'वर्ल्ड पारलमेंट ऑफ रिलीजन' मध्ये दिले होते. त्यांच्या भाषणात त्यांनी भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि धार्मिक सहिष्णुतेचे महत्त्व सांगितले. "आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत, त्याचं जीवन एक उद्दीष्ट आणि कामासाठी असावं" अशी शिकवण स्वामी विवेकानंद यांनी दिली आहे. त्यांनी भारतीय समाजाच्या प्रगतीसाठी एक शक्तिशाली संदेश दिला, तो म्हणजे "उठा, जागा व्हा आणि जेव्हा पर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत थांबू नका." स्वामी विवेकानंद यांनी योग, तत्त्वज्ञान आणि समाजकार्याच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं आहे. राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा... प्रा. अजय बी. कोंगे

"अध्यात्मयोगी आचार्य, श्री. विशुद्धसागरजी यांना संजय घोडावत विद्यापीठाची “मानद डॉक्टरेट” पदवी होणार प्रधान”

फोटो:  परमपूज्य, अध्यात्मयोगी आचार्य १०८ श्री विशुद्धसागरजी यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी जाहीर करतांना विश्वस्त विनायक भोसले, माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक, कुलगुरू प्रो. डॉ. उद्धव भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते. “अध्यात्मयोगी आचार्य श्री विशुद्धसागरजी यांना संजय घोडावत विद्यापीठाची  “मानद डॉक्टरेट” पदवी होणार प्रदान” कोल्हापूर : परमपूज्य, अध्यात्मयोगी आचार्य १०८ श्री  विशुद्धसागरजी महाराज यांना संजय घोडावत विद्यापीठाची “मानद डॉक्टरेट” पदवी संजय घोडावत विद्यापीठाच्या दिनांक ०१  मार्च २०२५ रोजी होणाऱ्या ६ व्या पदवीदान समारंभाच्या वेळी प्रदान केली जाणार आहे असे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी जाहीर केले आहे. यावेळी शिरोळ मतदार संघाचे माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक स्वामी नांदणी,  राजेश  घोडावत, युवराज शहा, विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. उद्धव भोसले,  रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.  श्री. विशुद्धसागरजी यांचे उल्लेखनीय क...