डॉ. विराट व्ही गिरी
डॉ. विराट गिरी (9 जानेवारी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
अल्पसा परिचय :डॉ. विराट व्ही गिरी यांचे शिक्षण एम-टेक कॉम्प्युटर, भारती विद्यापीठ पुणे, पीएचडी व्हीटीयु विद्यापीठ बेळगाव येथे पूर्ण झाली असून संजय घोडावत पॉलीटेक्निक-इन्स्टिट्यूट सलग बारा वर्षे प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत. करियर व व्यक्तिमत्व विकास दहावी आणि बारावीनंतर काय, करिअर वाटा, स्पर्धा परीक्षेमधील संधी व आव्हाने, अध्ययन व अध्यापन कौशल्य, संस्कार रुपी शिक्षण, उद्योग व व्यवसाय, शैक्षणिक व्यवस्थापन कौशल्य, शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थापन, सकारात्मक अभिरुद्धी विद्यार्थी व पालक अनेक विषयावर प्रबोधनात्मक व प्रोत्सानात्मक एक हजारांहून अधिक व्याख्याने डॉ. गिरी यांनी दिलेली आहेत. डॉ. गिरी यांचे सहा पुस्तके प्रकाशित झालेले असून. अनेक लोकप्रिय वर्तमानपत्रांमध्ये करिअर विषयावर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. नवोदय विद्यालयाचे गुणवान विद्यार्थी म्हणून डॉ. गिरी यांचे नाव घेतले जाते. विविध उल्लेखनीय कामकाजामध्ये या अगोदर विविध डॉक्टर गिरी यांना विविध उल्लखनीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये डॉ. सुजित मिंचेकर फाउंडेशन ‘आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार’, पाणी फाउंडेशन कडून ‘जलरत्न पुरस्कार’ स्वाभिमानी शिक्षक संघाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ आयएसटीस्कूल कडून ‘बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार’ टुडे रिसर्च अँड रेटिंग नवी दिल्ली या संस्थेमार्फत ‘बेस्ट अपकमिंग पॉलिटेक्निक इन महाराष्ट्र’ , "समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
डॉ. गिरी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाजा बद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले, यांचे विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यावर विविध कामाच्या दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी वेळेत व्यवस्थित बिनचूक रित्या पूर्ण केलेल्या आहे.
शैक्षणिक संस्थेविषयी डॉ. गिरी यांचे उद्गार:
विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच. संस्थेची प्रगती होत असते. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकांचे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित सर्व स्टाप, जागतिक दर्जाचे शिक्षण या सर्व गोष्टींमुळे आम्ही हे यश प्राप्त करू शकलो." "सर्व उद्याची सर्व फुले आजच्या बियांमध्ये आहेत." संजय घोडावत पॉलिटेक्निकचे रोपटे 2012 मध्ये संजय घोडावत शैक्षणिक कॅम्पस मध्ये लावण्यात आले होते आणि आज ते मोठ्या फळांच्या झाडाच्या रूपात बहरले आहे. 7 वर्षांच्या वैभवशाली प्रवासानंतर, पॉलिटेक्निकने बरीच क्रेडिट्स आणि प्रशंसा मिळवली आहे, हे सर्व अभ्यासक्रमांसाठी NBA मान्यता मिळवणारे सर्वात अल्प कालावधीचे पॉलिटेक्निक आहे.'नॉलेज रिव्ह्यू मॅगझिन' ने 2018 मधील देशातील टॉप 10 पॉलिटेक्निकमध्ये त्याची गणना केली आहे. MSBTE ने पॉलिटेक्निकला 'उत्कृष्ट रँक' दिला आहे आणि तिच्या इलेक्ट्रिक मशीन लॅबला सर्वोत्कृष्ट प्रयोगशाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमध्ये आवश्यक कौशल्ये मिळवून त्यांना रोजगारक्षम बनवण्यास आणि त्यांच्यात उद्योजकतेची भावना निर्माण करण्याच्या उदात्त कार्यावर या सर्व यशांचा समावेश आहे. आमचा असा विश्वास आहे की जे विद्यार्थी आमच्या पॉलिटेक्निकमध्ये चालतात ते संभाव्य उर्जा असतात आणि आमच्या कठोर शैक्षणिक, प्रयोगशाळांमधील प्रॅक्टिकलचा एक्सपोजर, इंडस्ट्री एक्सपोजर, सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण याद्वारे आम्ही त्यांना त्यांचे सर्वोत्तम आत्मसात करण्यास मदत करतो. संजय घोडावत पॉलिटेक्निकमध्ये मी सर्वांचे पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करतो आणि तुमच्या सूचनांचेही स्वागत करतो जेणे करून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल आणि आशादायक भविष्यासाठी सार्थक ठरू.
अग्रलेख :
प्रा. अजय बी. कोंगे,
विभाग प्रमुख,
डिपार्टमेंट ऑफ शॉट-टर्म कोर्सेस
कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग
संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे जिल्हा कोल्हापूर .