Posts

Showing posts from March, 2025

संजय घोडावत विद्यापीठाच्या एमबीए विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर पुरस्कार व रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक

Image
संजय घोडावत विद्यापीठाच्या एमबीए विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधन पेपर पुरस्कार व रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक कोल्हापूर: संजय घोडावत विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या एमबीए प्रथम वर्षाच्या रक्षा खंडेलवाल, ऋतुजा रिसवडकर, अंकित पटेल,पीयूष देशमाने, पारस टांकसाळे व ध्रुव मालदे  यांनी २८-२९ मार्च २०२५ रोजी रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ, भोपाळ, मध्यप्रदेश यांनी आयोजित केलेल्या "शोध शिखर - २०२५" या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित राहून आपले संशोधन पेपर व प्रकल्प सादर केले. यातील विद्यार्थिनी कु. ऋतुजा रिसवडकर आणि कु. रक्षा खंडेलवाल यांनी ‘शोध शिखर - २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या “मद्यपान आणि महिला - समावेशक सांस्कृतिक सक्षमीकरण आणि सामाजिक शाश्वत दृष्टीकोन" या विषयावरील संशोधन पेपरला सर्वोत्कृष्ट संशोधन पेपरचा पुरस्कार आणि रोख पारितोषिकासह सुवर्ण पदक जिकंले आहे. त्यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील डॉ. वि. एस. बालगावकर (सहयोगी प्राध्यापक) आणि डॉ. गिरी वाय.एल. (प्राध्यापक) यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाव...

संजय घोडावत आय.टी.आय. मधून ४२२ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे येथे निवड

Image
संजय घोडावत आय.टी.आय. मधून ४२२ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे येथे निवड कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आय.टी.आय. विभागात नुकताच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल, पुणे या नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या वतीने कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध आय.टी.आय. मधून एकूण ४८० विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी सहभाग घेतला. त्यापैकी ४२२ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड टाटा मोटर्सने केली.   टाटा मोटर्सच्या वतीने प्रताप गायकवाड, ओम काकड आणि अभय निकम यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवडीमुळे विद्यार्थ्यांना करिअरची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे, असे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी निवड यादी जाहीर करताना सांगितले. संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करून आपल्या करिअरची सुरुवात करावी, असे सांगून त्यांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.   कंपनीचे अधिकारी प्रताप गायकवाड यांनी विद्यार्थ्यांन...