Posts

Showing posts from January, 2026

घोडावत विद्यापीठात १७१ संशोधकांचा सहभाग

Image
शाश्वत विकासावर आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात घोडावत विद्यापीठात १७१ संशोधकांचा सहभाग  कोल्हापूर आतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल हेल्थकेअर, फूड सायन्स अँड एनर्जी (ICSHFE) २०२६  ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद  उत्साहात पार पडली. यामध्ये 171 संशोधकांनी सहभाग नोंदवला. तर 34 संशोधकांनी पेपर सादरीकरण केले. स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, स्कूल ऑफ सायन्सेस व स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले.    परिषदेसाठी फार्मसी, आरोग्य व संलग्न विज्ञान, अप्लाइड नॅनोमटेरियल्स तसेच लाईफ सायन्सेस या तीन प्रमुख विषयांतर्गत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग होता. विशेष म्हणजे सहभागींपैकी ७० टक्क्यांहून अधिक महिला संशोधक होत्या. यावेळी ४५ पोस्टर सादरीकरणे करण्यात आली. तसेच एका स्टार्ट अपद्वारे नव उत्पादनाचे प्रदर्शनही करण्यात आले.    परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी  कुलगुरू प्रा. उद्धव भोसले व विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत यश

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत  यश कोल्हापूर प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या धिरज प्रभुनाथ होळकुंदे याने “राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे. ‘साउथ आशिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धा’ जानेवारी २०२६ रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा १८५ सें.मी. व त्यापेक्षा अधिक उंचीच्या गटात घेण्यात आली असून, अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत धीरज होळकुंदे याने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना धिरज होळकुंदे म्हणाला की, “संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधील अत्याधुनिक जिम सुविधा, तसेच जिममधील मार्गदर्शक सचिन बागडी यांचे मोलाचे मार्गदर्शन मला सतत प्रेरणा देत राहिले. याशिवाय माझे आई-वड...

लोककलेला मिळालेली संजीवनी : रघुवीर खेडेकर यांना भारत सरकारचा पद्मश्री सन्मान...

Image
लोककलेला मिळालेली संजीवनी : रघुवीर खेडेकर यांचा पद्मश्री सन्मान भारतीय लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा ही केवळ एक करमणुकीची कला नसून ग्रामीण जीवनाची संवेदना, संघर्ष आणि उत्सव यांचे जिवंत प्रतिबिंब आहे. या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, अशा लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ व दिग्गज कलाकार रघुवीर खेडेकर यांना भारत सरकारतर्फे २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तमाशा या लोककला प्रकारातील त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत आणि समर्पित योगदानाची ही योग्य पावती असून, या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ रघुवीर खेडेकर यांनी तमाशा रंगभूमीवर अखंडपणे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची मुळे केवळ रंगमंचापुरती मर्यादित नसून, तमाशा या लोककलेच्या जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाशी घट्ट जोडलेली आहेत. त्यांच्या मातोश्री आई कातांबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेला तमाशा फड त्यांनी अत्यंत जिद्द, कष्ट आणि चिकाटीने आजतागायत यशस्वीपणे सांभाळला आहे. ही परंपरा पुढे नेणे हे त्यांच्या आयुष...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम कोल्हापूर, अतिग्रे : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  इचलकरंजी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय इंगवले,  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  अंकिता वांडेकर,  सहाय्यक निरीक्षक श्री. अजिंक्य डुबल,  सहाय्यक निरीक्षक  अनुसया माळी,  निरीक्षक. कुलकर्णी इन्स्टिट्यूटचे  संचालक डॉ. विराट गिरी, विद्यार्थी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  इंगवले यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अत्यंत उदाहरणासह  अधोरेखित केले. ते म्हणाले, “रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केल्याने केवळ शासकीय दंड टळत नाही, तर स्वतःच्या व इतरांच्या अमूल्य प्राणांचेही संरक्षण होते.” विद्यार्थ्यांकडे देशाच्या भवितव्याची धुरा असल्याचे नमूद करत त्यांनी स...

“संकट अचानक येते, पण तयारी जीवन वाचवते”

Image
"संकट अचानक येते, पण तयारी जीवन वाचवते” सुरक्षिततेचा मूलमंत्र: संकट कधी, कुठे आणि कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगता येत नाही. तो अचानक येतो—अपघात, आग, वीजधक्का, रासायनिक गळती, यंत्रातील बिघाड किंवा नैसर्गिक आपत्ती अशा कोणत्याही रूपात. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की योग्य नियोजन, शिस्तबद्ध कामपद्धती आणि पूर्वतयारी असेल, तर तोच खतरा जीवघेणा न ठरता नियंत्रित करता येतो. म्हणूनच “संकट (खतरा) अचानक येतो, पण तयारी जीवन वाचवते” हे वाक्य केवळ घोषवाक्य नसून जीवनरक्षक तत्त्वज्ञान आहे. आजच्या औद्योगिक, शैक्षणिक,  जीवन जगताना व बांधकाम क्षेत्रात सेफ्टी इंजिनियरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. सुरक्षित कार्यसंस्कृती रुजवणे, धोके ओळखणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यापासून संरक्षणाची प्रभावी व्यवस्था उभारणे हे सेफ्टी इंजिनियरचे मूलभूत कर्तव्य आहे. सुरक्षितता ही केवळ नियमांची पूर्तता नसून ती मानवी जीवनाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. नियोजन आणि संकल्पना सुरक्षिततेचे पहिले पाऊल म्हणजे जोखीम मूल्यांकन (Risk Assessment). कोणत्या कामात कोणते धोके संभवतात, त्यांची तीव्रता किती आहे आणि त्यावर क...

घोडावत इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक पालक मेळावा उत्साहात पार पडला

Image
 . घोडावत इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक–पालक मेळावा उत्साहात पार पडला कोल्हापूर (अतिग्रे) : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात आयोजित करण्यात आलेला शिक्षक–पालक मेळावा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले उपस्थित होते. या वेळी  इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी, पॉलिटेक्निक विभागाचे विभागप्रमुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. काजल बोहरा हे  उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण यांनी केले. मार्गदर्शन करताना विश्वस्त विनायक भोसले यांनी शिक्षक व पालकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर सखोल प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी मुलांना वेळ देणे, योग्य संस्कार करणे आणि त्यांच्या भावनिक गरजा समजून घेणे अत्यंत गरजेचे असल्याच...

“Full Body Safety Harness – Work at Height Protection” या विषयावर संपूर्ण मुद्देसूद व सविस्तर मार्गदर्शन

Image
“Full Body Safety Harness – Work at Height Protection” या विषयावर संपूर्ण मुद्देसूद व सविस्तर मार्गदर्शन  उंचावर काम करताना फुल बॉडी सेफ्टी हार्नेस (Full Body Safety Harness – Work at Height Protection) उंचावर काम करताना अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. अशा वेळी कामगाराच्या सुरक्षिततेसाठी फुल बॉडी सेफ्टी हार्नेस वापरणे अत्यंत आवश्यक आहे. खाली हार्नेसचे घटक, वापराचे नियम आणि सुरक्षिततेच्या सूचना सविस्तर दिल्या आहेत. 1) फुल बॉडी हार्नेस वापरण्याचे महत्त्व उंचावर काम करताना पूर्ण शरीराला आधार देण्यासाठी फुल बॉडी हार्नेस वापरणे बंधनकारक आहे. पडण्याच्या वेळी शरीरावर होणारा धक्का कमी करून प्राणरक्षण करते. केवळ कंबरपट्टा (waist belt) पुरेसा नसतो. 2) हार्नेसचे मुख्य भाग (Parts of Safety Harness) 2.1 Shoulder Straps (खांद्याचे पट्टे) खांद्यावरून जाणारे पट्टे शरीराचा भार समतोल ठेवतात. हार्नेस योग्य पद्धतीने स्थिर राहण्यास मदत करतात. 2.2 Chest Strap with Buckle (छातीचा पट्टा व बकल) हार्नेस शरीरावर घट्ट बसवण्यासाठी उपयोगी. पडताना हार्नेस सैल होऊ नये यासाठी महत्त्वाचा ...

“Types of Hazards”

“Types of Hazards”   धोके (Hazards) – प्रकार व स्पष्टीकरण धोका (Hazard) म्हणजे काय? कामाच्या ठिकाणी किंवा वातावरणात अशी कोणतीही परिस्थिती, घटक किंवा प्रक्रिया जी अपघात, इजा, आजार किंवा मालमत्तेचे नुकसान करू शकते, तिला धोका (Hazard) असे म्हणतात. 1) भौतिक धोके (Physical Hazards) हे धोके भौतिक घटकांमुळे निर्माण होतात. उदाहरणे : आवाज (Noise): सतत मोठ्या आवाजामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. कंपन (Vibration): यंत्रांच्या कंपनामुळे स्नायू व सांध्यांचे आजार होऊ शकतात. अतिशय उष्ण किंवा थंड तापमान: उष्माघात किंवा थंडीमुळे आजार होऊ शकतात. अपुरा प्रकाश: डोळ्यांवर ताण येतो व अपघाताची शक्यता वाढते. 2) रासायनिक धोके (Chemical Hazards) रसायनांच्या संपर्कामुळे होणारे धोके. उदाहरणे : धूळ (Dusts) वाफ/धूर (Fumes) वायू (Gases) वाष्पे (Vapours) द्रव रसायने (Liquids & Chemicals) विषारी, संक्षारक व ज्वलनशील पदार्थ परिणाम : त्वचारोग, श्वसनाचे आजार, विषबाधा, आग किंवा स्फोट. 3) जैविक धोके (Biological Hazards) सजीव घटकांमुळे होणारे धोके. उदाहरणे : जिवाणू (Bacteria) विषाणू (Viruses) बुरशी (Fungi) ...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड कोल्हापूर (अतिग्रे) : संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे पुणे येथील नामांकित औद्योगिक समूह “स्पार्क मिंडा” यांच्या वतीने  नुकताच आयोजित करण्यात आलेला कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ११ इंजिनिअरिंग महाविद्यालय चे एकूण ४१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ५१ विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी व मुलाखती अंतर्गत अंतिम निवड केली.  या कॅम्पस ड्राइव्हमध्ये  संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे १७ विद्यार्थ्यांची यशस्वी  निवड झाली असून त्यात यांत्रिकी अभियांत्रिकीचे १०, विद्युत अभियांत्रिकीचे ६ आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीचा १ विद्यार्थी समाविष्ट आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि. १५ जून २०२६ रोजी कंपनीत रुजू होण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २.४ लाख प्रतिवर्ष असे आकर्षक वेतन पॅकेज देण्यात येणार आहे.  या यशस्वी कॅम्पस ड्राइव्हसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे प्रमुख प्रा. आशिष पाटील...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

Image

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सचा परीक्षा निकाल उल्लेखनीय

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सचा पावसाळी परीक्षा निकाल उल्लेखनीय कोल्हापूर (आतिग्रे) : संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागा अंतर्गत सुरू असलेल्या "ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी" चा शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मधील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.  या कोर्समध्ये एकूण पाच विषयांपैकी तीन विषयांचा निकाल १००% टक्के लागला असून विभागातील  केसरकर ऋषिकेश  यांनी ७८.०० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, चिखले सूरज  यांनी ७७.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक,  पाटील सिद्धेश  यांनी ७७.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती  विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी  दिली. आजच्या औद्योगिक युगात सेफ्टी ऑफिसर ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. औद्योगिक अपघात टाळणे, कामगारांच्या जीवित व आरोग्याचे संरक्षण करणे, सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, आपत्कालीन परिस्थित...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘रोहित कळंत्रे याची’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘रोहित कळंत्रे याची’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड  कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित शिवलिंग कळंत्रे याची गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. रोहितच्या सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि बहारदार खेळाच्या जोरावर ही निवड झाली आहे. दिनांक ६ ते ११ जानेवारी दरम्यान गुजरात येथे होणाऱ्या या स्पर्धेत तो विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, तसेच इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, क्रीडा विभाग  प्रा. विनायक पावटे  यांनी रोहितचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर; ६० विद्यार्थ्यांची थेट निवड

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर; ६० विद्यार्थ्यांची थेट निवड कोल्हापूर अतिग्रे: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे जॉन डिअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर निवड प्रक्रियेत इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा इंजिनियरिंग, आय.टी.आय. विभागातील एकूण ६० विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी कंपनीचे प्रतिनिधी लवेश सोनी व निखिल काळे हे उपस्थित होते. हा जॉब फेअर कार्यक्रम संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.        या मुलाखत प्रक्रियेसाठी इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख आशिष पाटील, आय.टी.आय. विभागाचे  प्राचार्य अविनाश पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्राध्यपिका  रईसा मुल्ला, इन्स्टिट्यूट अकॅडमिक डीन प्रा. रविंद्र धोंगडी डिपार्टमेंट  समन्वयक सुशांत पाटोळे,  भाग्यश्री भालकर,  प्रथमेश गोंधळी यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी थेट नोक...

दूरदृष्टीचा शिक्षणयोद्धा : डॉ. विराट वसंतराव गिरी

Image
    डॉ. विराट गिरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा दूरदृष्टीचा शिक्षणयोद्धा : डॉ. विराट वसंतराव गिरी   आजच्या स्पर्धात्मक, तंत्रज्ञानप्रधान आणि झपाट्याने बदलणाऱ्या शिक्षणविश्वात केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे पुरेसे ठरत नाही; तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित नेतृत्व, दूरदृष्टी आणि संवेदनशील मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. अशा काळात संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील संचालक डॉ. विराट वसंतराव गिरी हे आधुनिक शिक्षणप्रवाहातील एक प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ठळकपणे समोर येतात. डॉ. गिरी यांची शैक्षणिक वाटचाल हीच त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारी आहे. डीसीओ, बी.ई. (आयटी), एम.टेक (कंप्युटर) आणि व्हीटीयू बेळगावी येथून पीएच.डी. अशी भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेल्या डॉ. गिरी यांनी शिक्षणाकडे केवळ पदवी किंवा नोकरी मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता, व्यक्तिमत्त्व घडवण्याची आणि समाज घडवण्याची प्रक्रिया म्हणून पाहिले आहे. आजवर त्यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांतील संधी व आव्हान...