संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर, अतिग्रे : सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे एआयसीटीई व डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने "शिक्षण आणि संशोधनात एआय वापरून शिक्षकांना सक्षम बनवणे" या विषयावर आधारित सहा दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १ ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षक, प्राध्यापकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयक आधुनिक तंत्रज्ञान, अध्यापन व संशोधनातील वापर, तसेच जबाबदार आणि नैतिक दृष्टिकोनातून एआयच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करणे हा आहे. कार्यक्रमातील महत्त्वाचे विषय शिक्षणात एआयची ओळख, स्मार्ट टीचिंगसाठी एआय टूल्स, वैयक्तिक व सर्वसमावेशक शिक्षणासाठी एआय, संशोधनातील एआयचा वापर, नैतिकता, पक्षपात...