संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय उद्योजकात दिवस उत्सवात साजरा.


संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय उद्योजकात दिवस उत्सवात साजरा. 

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या  उद्योजकता विकास  आणि तंत्रज्ञान व्यवसाय इंकुबेटर  सेल अंतर्गत राष्ट्रीय उद्योजकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योगजगतामध्ये नावाजलेले उद्योजक "अमर जाधव" मॅनेजिंग डायरेक्टर आकुरा टेक ग्रुप हे उपस्थित होते.

आपल्या प्रभावी मार्गदर्शनात ते म्हणाले, “उद्योजक होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही, तर प्रत्यक्षात रिस्क घेऊन कृती करावी लागते. उद्योग करणे म्हणजे केवळ नफा कमावणे नसून समाजसेवा करण्यासारखेच आहे. उद्योजकतेसाठी रात्रंदिवस परिश्रम करावे लागतात. ‘सिक्रेट’ सारखी प्रेरणादायी पुस्तके वाचून दृष्टीकोन बदलावा आणि नेहमी मोठे व्हिजन निवडावे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. विराट गिरी यांनी केले. त्यांनी जागतिक उद्योजकता दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. यावेळी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील तसेच डिग्री इंजिनिअरिंगचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन आणि आभार प्रदर्शन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी केले. सूत्रसंचालन डिप्लोमा प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनी सुहाना चौगुले, आदिती कोळेकर, इफात मोमीन आणि सुहाना निरांकरी यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होत.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)