संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन



संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन 


कोल्हापूर, अतिग्रे : सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे एआयसीटीई व डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने   "शिक्षण आणि संशोधनात एआय वापरून शिक्षकांना सक्षम बनवणे"   या विषयावर आधारित   सहा दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम   आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम   १ ते ६ सप्टेंबर २०२५   या कालावधीत आयोजन केले आहे.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षक, प्राध्यापकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स    विषयक आधुनिक तंत्रज्ञान, अध्यापन व संशोधनातील वापर, तसेच जबाबदार आणि नैतिक दृष्टिकोनातून एआयच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करणे हा आहे. कार्यक्रमातील महत्त्वाचे विषय शिक्षणात एआयची ओळख,  स्मार्ट टीचिंगसाठी एआय टूल्स, वैयक्तिक व सर्वसमावेशक शिक्षणासाठी एआय,  संशोधनातील एआयचा वापर,  नैतिकता, पक्षपातीपणा व जबाबदार एआय,  कॅपस्टोन प्रोजेक्ट्स व पॅनल चर्चा, या कार्यक्रमाद्वारे शिक्षकांना एआय संशोधन पद्धती, एआय टूल्सचा वापर करून स्मार्ट टीचिंग, तसेच विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवात सुधारणा घडवून आणण्याचे कौशल्य मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्राध्यापकांना  एआयसीटीई ट्रेनिंग अँड लर्निंग (ATAL) अकॅडमी तर्फे अधिकृत प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

कार्यक्रमात देशभरातील नामवंत  उद्योगतज्ज्ञ, प्राध्यापक व संशोधक   मार्गदर्शन करणार असून, यामुळे सहभागी शिक्षकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व कौशल्य मिळणार आहे. या उपक्रमाबाबत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी सर्व शिक्षक प्राध्यापकांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सागर चव्हाण व त्यांची टीम परिश्रम घेत आहे. संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले  यांनी या अभिनव उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)