प.पू. वेदांता चार्य योगमहर्षी बालब्रह्मचारी गुरुदेव श्री संत नारायण महाराज (बाबा) ,श्री क्षेत्र तारकेश्र्वर गड ..


प.पू. वेदांता चा र्य  योगमहर्षी बालब्रह्मचारी गुरुदेव श्री संत नारायण महाराज (बाबा) ,श्री क्षेत्र तारकेश्र्वर गड ..महिंदा ता .आष्टी जिल्हा बीड
परंतु पाथर्डी  जिल्हा अहील्यानगर जवळ आहे .वावर नगर जिल्ह्यात जास्त होता आजही आहे.

महाराज हे जन्मले ते मुळात जन्म झाल्यावर एकदम थोडे मोठे झाले आणि आईला स्वतः.चे अवतार कार्य सांगितले.ते एका पाटील घराण्यात जन्माला आले होते.

व आईच्या सांगण्यावरून परत ते बालक झाले .
शालेय शिक्षण गावी झाले  घरात मन रमले नाही.
वडिलांनी त्यांना किराणा दुकान टाकून दिली खूप लहान वयात पण लोकांना सामान द्यायचे पैसे मागत नव्हते त्यामुळं दुकान तोट्यात गेली.लोकांनी प्रामाणिक पने पैसे दिले नाही आणि ह्यांनी मागितले नाही.

पुढे ते घरदार सोडून आळंदीला गेले काही दिवस राहिले पण तिथेही मन फार काळ रमले नाही मग पंढरपूर येथे गेले.तिथे थोडे दिवस राहिले ईश्वर आज्ञा झाली आणि काशीला गेले.तेथे विश्व विद्यालय मध्ये त्यांना प्रवेश मिळाला.जन्मजात प्रचंड बुद्धिमान व लहान वयात ही चमत्कारच दिसत होते.

12 वर्ष वेद अध्ययन केले.
पुढे ऋषकेस जवळील जंगलात त्यांनी त पश्य र्या केली 
आत्मज्ञान प्राप्त झाले .
दृष्टांत झाले.
ईश्वर भेट झाली .आणि त्यांच्याच आज्ञेवरून प्रवचन सुरू केले.काही वर्ष युपी मध्येच राहिले .दिल्लीला एका संस्कृत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ही काम केले मिळणारा पगार लोकांना वाटून टाकत असतं.

पुढे तार्केश्वर गडावरील देवाने त्यांना दृष्टांत दिला व जन्म भूमीत येवून कार्य करायला सांगितले त्या नुसार प्रथम पंढरपूर येथे आले .मराठीत नीट प्रवच न कीर्तन करता यावे यासाठी श्री संत योगी वामन भाऊ यांची गुरू चरणी दास होऊन सेवा केली आणि अभ्यास केला.
पुढे त्यांना एकदा महिंद्या चे गावातील काही भक्त मंडळींनी त्यांना गावी कीर्तन करण्यासाठी आणले कीर्तन केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना गावातील लोकांना या पहाडावर आणले आणि तेथे गायांची कत्तल करून ते गो मास मुस्लिम खाटीक समूदाय विकत असे.
प्रथम महाराजांनी सगळ्यांच्या सांगण्यावरून बंद केले.
आणि ते मुसलमान लोकांनी बंद केले लगेच .महाराजांनी तेथे लोकांना सांगितले की या जागेत तारक ना थ  यांची पिंड आहे येथे सहा फूट खाली .ही जागा खोदा.लोकांनी साहित्य आणून तात्काळ खोदकाम केले पिंड मिळाली.

तिची स्थापना केली पण लोकांनी बाबांना सोडले नाही तर दगड खैरे नावाच्या व्यक्तीने 17 एकर जमीन त्यांना लगेच दान केली.आणि महाराजांचा सन्यास मार्ग प्रवचन कीर्तन समाज सेवा कार्य येथून सुरू झाले.लोकांनी वर्गणी गोळा करून त्यांना एक माडी बांधून दिली तोच हा तारकेश्वर ग ड 
भक्त गण तयार होत गेला.
लाखो भक्तांचे कल्याण केले.त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या.लाखो लोकांनी त्यांचे सर्व अनुभव घेतले.
मी स्वतः त्यांचा 1975 पासून  भक्त आहे.50 वर्ष मोजून होऊन गेली.मी त्यांचा दास आहे.

बाबांचे कार्य फार अफाट होते.ते एवढे मोठे कार्य शब्दात येथे व्यक्त करणे शक्य नाही.खूप मोठा ग्रंथ तयार होईल त्यांच्यावर आणि केला आहे दुसरे एक भक्तांनी.
पंढरपूर आळंदी आणि गड येथे मोठमोठे धर्मशाळा आहेत 
पैठण पंढरपूर आळंदी येथे आषाढी  एकादशीला...पंढरपूर ला दिंडी जाते त्यांना तेथे मान आहे आजही आहे.
आळंदीला कार्तिकला असतात तर मार्च मध्ये नाथ षष्ठी असतात.याच कार्यक्रमात आपण सर्वजण मिळून काल्याचा महाप्रसाद व्यवस्था करतो.

मी आज 50 वर्ष माझ्या आयुष्यातील बाबांच्या चरणी जीवन अर्पण केले त्या प्रसंगातून जसे जमेल तसे यथाशक्ती सेवा देण्याचा प्रयत्न केला.
मी त्यांचे खूप अनुभव घेतलेले आहे.त्यांनी मला मंत्र दिक्षाही दिली.माझे सर्व आयुष्याचे भविष्य ही सांगितले होते ते सर्व खरे ही ठरले 
असा मी भाग्यवंत ठरलो .मला त्यांचा सहवास लाभला.ते दरवर्षी आमच्या घरी भक्त सेवा घेण्यासाठी येतात .गेले 38 वर्ष संपले. अखेर अंतिम काळी मी गडावर गेलो होतो जेव्हा त्यांना समाधिस्त केले तेव्हा लाखो समूदाय गडावर आला होता.भक्तगण धायी ढायी हाय मोक्कलून रडत होता.
तदनंतर त्यांचे अनुयायी आणि आमचे गुरुबंधू ....
आता मठादी पती त्यांचे उत्तर अनुयायी प.पू.गुरुदेव शांतीब्रह्म प्रेममुर्ती आदिनाथ महाराज त्यांचे उत्तोरोतर कार्य खूप चांगले सांभाळत आहे.त्या पदाला शोभतील असे अलौकिक कार्य करत आहे.खूप बांधकामे केली 
सुधारणा केल्या.
अव्वा क्या सव्वा कामे केली
करत आहे.
पंढरपूर मध्ये आता परत नवीन जागा गावात घेतली.थोड्याच दिवसात मोठा मठ दिसेल.भक्तांची पूर्ण सोय तिथे होईल.

बाबांच्या आशीर्वादाने आमचे खूप कल्याण झालेले आहे.अनुभव सत्य आहे.
सहज दोन शब्द व्यक्त करावेसे वाटले.म्हणून लिहिण्याचा उपद्व्याप केला.
सर्व भक्त गण साठी ही खूप थो ड क्यात संक्षिप्त माहिती निवेदन केली 
ती गोड मानून घ्यावी.गुरू बद्दल दोन शब्द.💐💐

🌹🌹रामकृष्ण हरि 🌹🌹
           जय गुरुदेव
             🙏🙏

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)