Posts

Showing posts from August, 2025

संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन  कोल्हापूर, अतिग्रे : सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे एआयसीटीई व डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने   "शिक्षण आणि संशोधनात एआय वापरून शिक्षकांना सक्षम बनवणे"   या विषयावर आधारित   सहा दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम   आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम   १ ते ६ सप्टेंबर २०२५   या कालावधीत आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षक, प्राध्यापकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स    विषयक आधुनिक तंत्रज्ञान, अध्यापन व संशोधनातील वापर, तसेच जबाबदार आणि नैतिक दृष्टिकोनातून एआयच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करणे हा आहे. कार्यक्रमातील महत्त्वाचे विषय शिक्षणात एआयची ओळख,  स्मार्ट टीचिंगसाठी एआय टूल्स, वैयक्तिक व सर्वसमावेशक शिक्षणासाठी एआय,  संशोधनातील एआयचा वापर,  नैतिकता, पक्षपात...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन न्यूज 18 लोकमतचे वरिष्ठ वृत्तनिवेदक विलास बडे यांची प्रमुख उपस्थिती.

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी संपण  न्यूज18 लोकमतचे वरिष्ठ वृत्तनिवेदक विलास बडे यांची प्रमुख उपस्थिती  चौकटीत : पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था  "संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे कोल्हापूर" असे गौरवोद्गार विलास बडे यांनी काढले कोल्हापूर  – संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इन्स्टिट्यूटच्या ग्रीन  कॅम्पस मध्ये वृक्षारोपण व दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज18 लोकमतचे सीनियर वरिष्ठ वृत्तनिवेदक  विलास बडे, सिंजेंटा इंडिया प्रा.लि. संचालक डॉ. माधवानंद काशीद, कंट्री लीड प्रा.लि चे संचालक श्रीधर लाढाणे, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. एम एस काळे, प्रा. सौ. एन एस सासणे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय उद्योजकात दिवस उत्सवात साजरा.

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय उद्योजकात दिवस उत्सवात साजरा.  कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या  उद्योजकता विकास  आणि तंत्रज्ञान व्यवसाय इंकुबेटर  सेल अंतर्गत राष्ट्रीय उद्योजकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योगजगतामध्ये नावाजलेले उद्योजक "अमर जाधव" मॅनेजिंग डायरेक्टर आकुरा टेक ग्रुप हे उपस्थित होते. आपल्या प्रभावी मार्गदर्शनात ते म्हणाले, “उद्योजक होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही, तर प्रत्यक्षात रिस्क घेऊन कृती करावी लागते. उद्योग करणे म्हणजे केवळ नफा कमावणे नसून समाजसेवा करण्यासारखेच आहे. उद्योजकतेसाठी रात्रंदिवस परिश्रम करावे लागतात. ‘सिक्रेट’ सारखी प्रेरणादायी पुस्तके वाचून दृष्टीकोन बदलावा आणि नेहमी मोठे व्हिजन निवडावे,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. विराट गिरी यांनी केले. त्यांनी जागतिक उद्योजकता दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. यावेळी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील तसेच डिग्री इंजिनिअरिंगचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयो...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या १३ वा वर्धापन दिनानिमित्त “निंबस २ के २५” विविध नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या १३ वा वर्धापन दिनानिमित्त  “निंबस २ के २५” विविध नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे १३ वा वर्धापन दिनानिमितत्ताने “निंबस २ के २५” या राष्ट्रीय स्तरावरील भव्य स्पर्धेद्वारे २३ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमात नवोन्मेष, प्रेरणा आणि उत्सव यांचा सुंदर संगम पहायला मिळणार आहे. नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कॅड बस्टर, पोस्टर प्रेसेंटेशन, सर्किट्रिक्स हँक हंट, मेलोडी मस्ती, तसेच कौन बनेगा सवालों का सरताज अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. विजेत्यांसाठी रु. १,००,००० पर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यावेळी रक्तदान शिबिर व पुस्तक दान उपक्रम या सामाजिक जबाबदारीशी निगडित कार्यक्रमांचाही समावेश केलेला असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्याचा इन्स्टिट्यूटचा मुख्य हेतू आहे. हा कार्यक्रम संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शना...

प.पू. वेदांता चार्य योगमहर्षी बालब्रह्मचारी गुरुदेव श्री संत नारायण महाराज (बाबा) ,श्री क्षेत्र तारकेश्र्वर गड ..

Image
प.पू. वेदांता चा र्य  योगमहर्षी बालब्रह्मचारी गुरुदेव श्री संत नारायण महाराज (बाबा) ,श्री क्षेत्र तारकेश्र्वर गड ..महिंदा ता .आष्टी जिल्हा बीड परंतु पाथर्डी  जिल्हा अहील्यानगर जवळ आहे .वावर नगर जिल्ह्यात जास्त होता आजही आहे. महाराज हे जन्मले ते मुळात जन्म झाल्यावर एकदम थोडे मोठे झाले आणि आईला स्वतः.चे अवतार कार्य सांगितले.ते एका पाटील घराण्यात जन्माला आले होते. व आईच्या सांगण्यावरून परत ते बालक झाले . शालेय शिक्षण गावी झाले  घरात मन रमले नाही. वडिलांनी त्यांना किराणा दुकान टाकून दिली खूप लहान वयात पण लोकांना सामान द्यायचे पैसे मागत नव्हते त्यामुळं दुकान तोट्यात गेली.लोकांनी प्रामाणिक पने पैसे दिले नाही आणि ह्यांनी मागितले नाही. पुढे ते घरदार सोडून आळंदीला गेले काही दिवस राहिले पण तिथेही मन फार काळ रमले नाही मग पंढरपूर येथे गेले.तिथे थोडे दिवस राहिले ईश्वर आज्ञा झाली आणि काशीला गेले.तेथे विश्व विद्यालय मध्ये त्यांना प्रवेश मिळाला.जन्मजात प्रचंड बुद्धिमान व लहान वयात ही चमत्कारच दिसत होते. 12 वर्ष वेद अध्ययन केले. पुढे ऋषकेस जवळील जंगलात त्यांनी त पश्य र्या केली...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात ‘प्रारंभ २०२५’ उत्साहात संपन्न

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात ‘प्रारंभ २०२५’ उत्साहात संपन्न उच्च ध्येयासाठी धैर्य, आत्मविश्वास व परिश्रम आवश्यक – विश्वस्त विनायक भोसले  कोल्हापूर, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतीग्रे येथील पॉलिटेक्निक विभागात डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रारंभ २०२५’ हा प्रेरणादायी उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.  यावेळी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, कार्यक्रम समन्वयक व्ही. व्ही. जाखलेकर, प्रा. डी. ए. सनदे,  इन्स्टिट्यूटमधील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी धैर्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक आहेत. यशास...

20 Short Safety Moments for Meetings (5-Minute Discussions).

Image
This image is a safety toolbox talk resource titled “20 Short Safety Moments for Meetings (5-Minute Discussions)” . It provides a quick-reference list of essential safety topics for daily or weekly safety meetings at worksites, factories, workshops, or any environment where occupational hazards exist. 📋 Information & Purpose Each point on the list represents a short discussion topic (about 5 minutes each) designed to raise safety awareness among workers. These topics address common workplace hazards and preventive measures . The list can be used by supervisors, safety officers, or team leaders to plan daily or weekly safety briefings . By rotating through these topics, you ensure comprehensive coverage of critical safety aspects over time. 🛠️ Use of the List Before the shift : Pick one topic and conduct a 5-minute talk. During safety meetings : Structure discussions using these points. For training schedules : Incorporate topics into ongoi...

"पाटीवरची मैत्री, मॅटवरचा पराक्रम – पप्पू शिरसाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली"

Image
  "राजेंद्र उर्फ पप्पू” " पाटीवरची मैत्री , मॅटवरचा पराक्रम – पप्पू शिरसाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली" लेखक : प्रा. अजय ब. कोंगे शिरसाटवाडी हे नाव पाथर्डी तालुक्यात अनेक जणांसाठी ओळखीचं असेल. पण या गावाला देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात नाव मिळवून देणाऱ्या एका असामान्य , मित्रप्रेमी आणि खेळाडू व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगायची म्हणजे “राजेंद्र उर्फ पप्पू” शिरसाट. माझ्यासाठी पप्पू फक्त एक खेळाडू नव्हता , तो एक जिवाभावाचा मित्र होता. तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा , पण आमच्यातली मैत्री वयाचं अंतर विसरून गेलेली. एकत्र पोहायला जाणं , वेगवेगळ्या मैदानांवर खडतर सराव करणं , ‘ जय बजरंग व्यायाम शाळा ’ त घोडके मामा यांचं मार्गदर्शन घेऊन कुस्तीचे धडे गिरवणं तालुक्यातील आणि जिल्हातील वेगवेगळ्या गावच्या हंगामा (फडाला) जाणे   आमचं बालपण , तारुण्य , आणि मैत्री याच मातीवर घडली. वडिलांचा वारसा , क्रीडाक्षेत्र आवडता छंद पप्पूच्या अंगी खेळाचं बाळकडू त्याच्या वडिलांकडून आलं होतं आदरणीय कै. महादेव शिरसाट सर. शाळा आणि समाज कार्यासाठी झटणारे , विद्यार्थ्यांच्या पा...