संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम कोल्हापूर, अतिग्रे : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इचलकरंजी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय इंगवले, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अंकिता वांडेकर, सहाय्यक निरीक्षक श्री. अजिंक्य डुबल, सहाय्यक निरीक्षक अनुसया माळी, निरीक्षक. कुलकर्णी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, विद्यार्थी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इंगवले यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अत्यंत उदाहरणासह अधोरेखित केले. ते म्हणाले, “रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केल्याने केवळ शासकीय दंड टळत नाही, तर स्वतःच्या व इतरांच्या अमूल्य प्राणांचेही संरक्षण होते.” विद्यार्थ्यांकडे देशाच्या भवितव्याची धुरा असल्याचे नमूद करत त्यांनी स...