वंजारी समाज
वंजारी हा समाज लढवय्या आहे.मेहनती आहे.या लोकांनी ऊस तोडून जमिनी विकत घेतल्या आहेत.आणि लेकरांच्या शिक्षणासाठी वेळ पडली तर त्याच जमिनी विकल्या आहेत.आज वंजारी समाजातील गरीबातल्या गरीब व्यक्तीला शिक्षणाचं महत्त्व समजलेलं आहे.
या समाजाला संत भगवानबाबा, वामनभाऊ यांच्यासारख्या संतांचे अधिष्ठान लाभले आहे.आणि राजकिय क्षेत्रात गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा नेता लाभलेला होता.आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाचं ऋण फेडले पाहिजे यासाठी वंजारी समाजाला त्यांनी वेगळं आरक्षण दिलं.सोबतच इतर ओबीसीतील जातींचेही वर्गीकरण केले.ओबीसीतील या अतिमागास जातींना त्यामुळे फी माफी झाली.वंजारी समाजाला मिळालेल्या २% आरक्षणाचा आणि फी माफीचा असा फायदा झाला की वंजारी समाजातील गरीबातल्या गरीब मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी बाहेरगावी जाता आलं.आईबाप शेतात कष्ट करून आपल्या मुलाच्या राहण्याखाण्याची सोय होईल इतपत पैसे आपल्या पोटाला चिमटा काढून पाठवू लागले.वंजारी समाजातील होतकरू मुलांनीही कुठल्याही स्पर्धा परीक्षेत असो किंवा ज्या क्षेत्रात ते उतरतात तिथे आरक्षणातील कट ऑफ ओपन इतकाच असतो. आणि त्यातले त्यात ओपनमधून मेरीट काढणाऱ्या वंजारी मुलांची संख्या लक्षणीय असते.शैक्षणिक आरक्षणाचा योग्य वापर कसा करावा हे वंजारी समाजाने दाखवून दिले आहे.त्यामुळेच अनेकांना बिंदू नामावली वगैरेचा आधार घेऊन समाजाला लक्ष्य करायला कारण मिळते.
एक पिढी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या हयातीत आरक्षणाचा वापर करून शिकली आणि मग त्या पिढीच्या जीवावर प्रत्येक घरात डॉक्टर, इंजिनियर, सरकारी अधिकारी आणि शिक्षकांची तर मोजदादही नाही इतके नोकरदार घडले. महाराष्ट्राच्या मिडियात,आरोग्य व्यवस्थेत, प्रशासनात तसेच देशपातळीवरही आज आपल्या प्रामाणिकपणाच्या बळावर समाजातील थोर मंडळी वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स गाजवत असतात.
या समाजातील कर्त्या पिढीचा पाया आता इतका मजबूत झालेला आहे की, एका हत्या प्रकरणात आरोपी असलेल्यांची जात वंजारी आहे म्हणून पूर्ण समाजाला लक्ष्य करणाऱ्या चौथी नापास लोकांनी कितीही टारगेट करून त्यांना लेबलं लावण्याचा प्रयत्न केला तरी जी प्रगतीची रांग तयार झाली आहे ती आता कुणीही तोडू शकत नाही.अशा लेबल्सबद्दल समाजातील लोकांनी वाईट वाटून घेण्याचे कारणही नाही कारण हे एखाद्या अशिक्षित व्यक्तीचे मत म्हणूनही आपल्याला दुर्लक्षित करता येईल. कुठल्याही समजातील गुन्हेगार त्या समाजाचा चेहरा नसतात.कित्येकदा दलीत, आदिवासी समाजातील अत्याचारांत सरंजामी प्रवृत्तीचे जातीवादी लोक सहभागी असतात पण त्यामुळे कुणीही ते ज्या जातीचे आहेत त्या संपूर्ण जातीला लेबल लावत नाही.
आजही वंजारी समाजातील प्रत्येकाला जोडणारा एक हळवा धागा म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब आहेत.ते जाऊन इतकी वर्षे झाली तरी समाजातील लोकं त्यांना कधीच विसरू शकणार नाहीत.त्यांनी फक्त आरक्षण दिलं नाही तर ते जेव्हा राज्याचे नेतृत्व करत होते तेव्हा त्यांनी दाखवून दिलं की लोकसंख्येने कमी असलेल्या समाजाचा माणूसही मोठ्या पदापर्यंत पोहचू शकतो फक्त त्या व्यक्तीने आपल्या क्षमतांचा योग्य वापर करावा.मुंडे साहेबांनी समाजाला ओळख दिली. नाव दिलं. राजकिय समज दिली.पाठीचा कणा ताठ केला. त्यांनी कधीही समाजावर इतिहासाचे उकांडे उकरून ओझं दिलं नाही उलट भविष्याचा मार्ग दाखवला.ते गेल्यानंतर कधीही भरून न येणारं नुकसान या समाजाचं झालं.पण या दृष्ट्या नेत्याने वंजारी समाजाला स्टँड होण्यासाठी करता येतील त्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या त्यामुळे आज वंजारी समाजाला कसलीही भिती उरलेली नाही. वंजारी समाजातील लोकं आता सामाजिक , आर्थिक आणि राजकियदृष्ट्या बऱ्यापैकी सक्षम झालेली आहेत.
ओबीसींच्या एकीकरणात वंजारी समाजाची मुख्य भूमिका आहे.सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका समाजातील लोकांची आहे.ओबीसींच्या हितांसाठी लढण्यात वंजारी समाज आधीही पुढे होता.आणि आताही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.वडीगोद्रीतील उपोषण असो की ओबीसी नेत्यांच्या आरक्षण बचाव सभा असोत, ओबीसी नेत्यांच्या मागे ताकदीने ऊभा राहण्याची वेळ आली तेव्हा वंजारी समाजाने कधीच ओबीसींचे नेतृत्व कोण करतोय हे बघितलं नाही.जेव्हा वंजारी समाजातील पुढच्या पिढीच्या नेत्यांनी निवडणूकीतील नफा नुकसान बघून कच खाल्ली तेव्हा वंजारी समाज ओबीसींसाठी पिवळ्या झेंड्याखाली समस्त ओबीसींसोबत लढला.लोकसभेला आपले नेते आपल्यासाठी थेट भूमिका घेत नाहीत हे समजूनही त्या नेत्यांची राजकिय मजबूरी ओळखून समाजाने स्वखर्चाने रांगा लावून त्यांना लाखोंच्या घरात मतदान दिले. ओबीसींसाठी लढताना वंजारी समाजातील लोकांना बहुसंख्याकांकडून होणारा त्रास आजही सहन करावा लागत आहे.आपले हक्क सुरक्षीत ठेवण्यासाठी लढताना त्रास होणे साहजिकच आहे.
पण आज मला वाटतं वंजारी समाजाने शिक्षणाचा, व्यवसायाचा, ब्ल्यू कॉलर जॉब आणि प्रशासनात जाण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे त्यावरच अधिक भर द्यावा.राजकारण निवडणूकापूरते करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर जास्त भर द्यावा. गोपीनाथ मुंडे साहेबांसारखं जागेवर चेक लिहून देऊन मदत करण्याचे दिवस त्यांच्याबरोबरच गेलेले आहेत.आता कुठलाही नेता, मंत्री संत्री आपल्या खिशाला झळ बसू देत नाही भलेही तो हजारो कोटी कमवत असेल.त्यामुळे आताच्या राजकारणाच्या मर्यादा समजून घेऊन गरीब, मध्यमवर्गीय समाजबांधवांनी आपापल्या प्रगतीसाठी मेहनत करावी.जेव्हा समाजावर संकटे येतात तेव्हा आपले नेते राजकिय नफातोटा बघतात. त्यामुळे कित्येकवेळा नेते नसताना अन्यायाविरोधात समाजाला पुढे होऊन मोर्चे काढावे लागले आहेत हेही समाजाने न विसरता शक्यतो वाद टाळावेत.
ज्या बीड जिल्ह्यात जवळपास अर्धी लोकसंख्या वंजारी समाजाची असूनही तिथे चांगल्या शाळा, चांगले दवाखाने,चांगली वाहतूक व्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतील तर किती दिवस तिथल्याच राजकारणावर आपण वेळ वाया घालवावा.त्यापेक्षा पुणे, मुंबई,नवी मुंबई आणि देश विदेशात ज्या ज्या व्यवसायाच्या, व्यापाराच्या संधी मिळतील तिथं जाऊन स्वतःला सक्षम बनवावे.सुरुवातीला एका पिढीला त्रास होईल पण पुढच्या कित्येक पिढ्या त्यामुळे सुखाने जगतील.
वंजारी समाजाने आपल्या अध्यात्मिक परंपरा जपाव्यात.पण त्यावर अवाढव्य पैसा उडवू नये.गुन्हेगार, गुन्हेगारी, घोटाळेबाज, बेकायदेशीर उद्योग करणाऱ्या लोकांपासून मग ते वंजारी समाजाशी निगडित असतील तरीही चार हात लांब रहावे. वंजारी समाजाकडे आता इतके सोशल कॅपिटल तर नक्कीच आहे की एखाद्याने काही करायचे ठरवलेच तर हजारो हात त्याच्या मदतीसाठी दृश्य अदृश्यरीत्या त्याच्या पाठीशी ऊभे राहतील.,, 🙏 🚩 रामेश्वर सोनुने मुंडे भक्त
जय भगवान जय गोपीनाथ🚩