संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात

संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात

“मला हवं ते मी मिळवतो; परंतु ते माझं एकट्याचं यश नसून माझ्यासोबत अहोरात्र परिश्रम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याच्या विश्वास, निष्ठा आणि सुयोग्य नियोजनाचे फलित आहे.” — चेअरमन संजय घोडावत

जयसिंगपूर : शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत भक्कम ठसा उमटवणारे संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.  संजय घोडावत विद्यापीठ च्या  प्रांगणात तसेच संजय घोडावत समूहाच्या मुख्य कार्यालयात सकाळपासूनच हितचिंतकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन तसेच समाजमाध्यमांद्वारे शुभेच्छा वर्षाव केल्या.

या प्रसंगी सौ. नीता घोडावत, विजयचंद घोडावत, राजेश घोडावत, राकेश घोडावत, सचिव श्रेणिक घोडावत, सौ.सलोनी घोडावत, विश्वस्त  विनायक भोसले, कुलगुरू  डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, संचालक डॉ. विराट व्ही. गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

शुभेच्छापर भाषणात विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत यांच्या दूरदृष्टी, ठाम निर्णयक्षमता आणि प्रत्येक कार्यातील आत्मविश्वासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्यप्रवासातील यशोगाथा उलगडत नेतृत्वाचे प्रेरणादायी पैलू त्यांनी अधोरेखित केले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीत त्यांच्या नेतृत्वाचे मोल विशद केले.

स्वतःच्या मनोगतात चेअरमन संजय घोडावत यांनी संघभावना, सातत्यपूर्ण परिश्रम आणि निष्ठेवर भर देत, “हे यश माझे नसून माझ्यासोबत कार्यरत प्रत्येक सहकाऱ्याचे आहे,” असे स्पष्टपणे नमूद केले. समाजसेवेच्या भावनेतून ' नीता संजय घोडावत फाउंडेशन' च्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच कर्नाटक डीलर असोशियन अंतर्गत ' चेअरमन संजय घोडावत' पुस्तकाचे प्रकाशन समारंभ पार पडला.  प्रमोद कमलाकर यांनी सुवर्णमूर्ती अर्पण करून त्यांचा सन्मान केला. 

उत्साह, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असलेला हा वाढदिवस सोहळा अभिनंदनापुरता मर्यादित न राहता समाजहिताच्या नव्या संकल्पांना प्रेरणा देणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोहन तिवडे यांनी  केले, तर आभारप्रदर्शन रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे  यांनी मानले.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)