Posts

जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम ’ग्लोबल सिटीझन' घडवू : संजय घोडावत

Image
   जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम ’ग्लोबल सिटीझन'  घडवू  संजय घोडावत चेअरमन, संजय घोडावत  पुणेः-  शैक्षणिक प्रगतीसह दैनंदिन जीवनाशी संबंधित कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत करून देण्यावर आमचा भर राहणार असून झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम 'ग्लोबल सिटीझन' घडवू, असा विश्वास संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांनी व्यक्त केले.  सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरीटेबल ट्रस्टतर्फे मुळशी मधील रावडे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुल या शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन चेअरमन संजय घोडावत यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल रावडे, मुळशी, पुणेच्या संचालक आणि मुख्याध्यापक सस्मिता मोहंती, विश्वस्त विनायक भोसले, माहिती-तंत्रज्ञान विभाग प्रमुख लकी सुराणा, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल रावडे, मुळशीचे मुख्याध्यापक मायकल पिअरसन, उपमुख्याध्यापक दुश्यंत अभिजीत आणि अर्चना पाटील, विश्वस्त फरहान अझर, मार्गदर्शक दर्पण वासुदेव आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी बोलताना संज...

दहावीनंतर करीअर संधी

दिनांक 27 मे 2024 रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागला आहे , उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 10 वी नंतर नेमके काय करायचे हे माहीत नसल्यास आपण  संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. दहावीनंतर आपण लगेच करीयर ओरिएंडेट अभ्यासक्रमाच्या शोधात जातो , तर ज्यांना दहावीनंतर लगेचच जॉब हवा आहे , अशांनी आयटीआय मधील कोर्सेस / अभ्यासक्रम पुर्ण करावेत . ज्यांमध्ये आपणांस अनेक प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण करता येईल . त्यानंतर आपणांस स्वत : चा अथवा खाजगी / सरकारी कंपनी मध्ये लगेचच नोकरी मिळेल . आयटीआय मध्ये आपणांस , फिटर , टेलरिंग , कटींग , ब्युटी पार्लर , कारपेंटर , मोटार ड्रायव्हिंग कम मेकॅनिकल , फॅशन डिझायनिंग , प्लंबर , मेकॅनिकल डिझेल , मेकॅनिक , वेल्डर , बुक बाइंडर , स्टेनो , बेकरी , कुक , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , कोपा अशा प्रकारचे अनेक कोर्सेस करता येईल . ज्यांमध्ये आपणांस कोर्सेस पुर्ण झाल्याच्या नंतर लगेच स्वत : चा व्यवसाय अथवा खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळेल . 10 वी नंतर शैक्षणिक अभ्यासक्रम :  इयत्ता 10 वी नंतर आपण 11 वी इयत्तेत कला , विज्ञान , वाणिज्य शाखेत अभ्यासक्रम पुर्ण करु शकता...

एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून घोडावत विद्यापीठास रँकिंग जिल्ह्यात 1 ले,राज्यात 5 वे तर देशात 31 वे स्थान

Image
एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून घोडावत विद्यापीठास रँकिंग जिल्ह्यात 1 ले,राज्यात 5 वे तर देशात 31 वे स्थान अतिग्रे: एज्युकेशन वर्ल्ड या मासिका द्वारे देशभरात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांना 2024-25 चे श्रेयांकन जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट 300 विद्यापीठातून संजय घोडावत विद्यापीठाने खाजगी विद्यापीठांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम,राज्यात पाचवे तर देशात 31 वे स्थान पटकावले.       विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. ज्याचा लाभ विद्यार्थी घेत आहेत. उत्तम प्रशासन,उत्तम शिक्षण,सोयी- सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांची “मदरसन ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजिस अँड इंजिनीरिंग प्रायव्हेट लिमिटेड” मध्ये निवड.

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांची “मदरसन ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजिस अँड इंजिनीरिंग प्रायव्हेट लिमिटेड” मध्ये निवड. संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे मदरसन ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजिस अँड इंजिनीरिंग कंपनीमध्ये निवड झालेले विद्यार्थी.   जयसिंगपूर : संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक इलेकट्रीकल इंजिनीरिंग विभागातील हर्षवर्धन पाटील, पंकज सूर्यवंशी, आणि  मेकॅनिकल इंजिनीरिंगच्या प्रथमेश कांबळे, राजवर्धन बाले या चार  विद्यार्थ्याची निवड “मदरसन ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजिस अँड इंजिनीरिंग प्रायव्हेट लिमिटेड”  कंपनीमध्ये  झाली आहे.   संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या  ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. मदरसंन ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजिस अँड इंजिनीरिंग प्रायव्हेट लिमिटेड एक प्रख्यात कंपनी असून भारतभर तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे.   नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे...

विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून बेडची केली निर्मिती

Image
 संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांना “राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत  एक लाख रक्कमेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस”  विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून बेडची केली निर्मिती News writer Prof. Ajay B Konge: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई संचलित, शासकीय तंत्रनिकेतन, मिरज राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्या स्पर्धेमध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे श्रीवर्धन अभिजीत पाटील, रसिका अनिल माने, ऋतुजा रवींद्र माने, शाहिद रमजान जमादार या  चार विद्यार्थ्यांना ”कॉस्ट इफेक्टिव्ह इलेक्ट्रिक आयसीयु बेड विथ ड्वेल ऍक्टिव्हेशन“ या पकल्पास प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये बक्षीस प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य सर्व डॉक्टरांना बेडच्या सुविधेमध्ये मोठा फायदा होणार असून या प्रकल्पामध्ये  इलेक्ट्रिक आयसीयु बेड सुविधा उपलब्ध असून हा बेड इतर बेडच्या तुलनेत कमी खर्चात मिळणार आहे. या बेडमध्ये जास्तीच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी श्री हॉस्पिटल इक...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावर “युरेका-२४ तांत्रिक प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावर “युरेका-२४ तांत्रिक प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन News Writer Prof. Ajay B Konge  :  संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० ते ५.००  या वेळात डिप्लोमा अभियांत्रिकी मधील पदविका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय स्तरावरील युरेका-२४ प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. कोणतेही विभागाचे डिप्लोमा अंतिम वर्षाचे विद्यार्थी या प्रकल्प स्पर्धेचे सहभागी होऊ शकतात, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही.    https://forms.gle/HiRpPa4VWPUhBwsd9      पॅरामीटर्स तंत्रज्ञानाची निवड, प्रकल्पाचा सामाजिक प्रभाव, इको-फ्रेंडली/उपलब्ध संसाधने आणि साहित्याचा सर्वोत्तम वापर, प्रोटोटाइप/वर्किंग मॉडेल/व्हर्च्युअल मॉडेल/मॉकअप मॉडेल, प्रकल्पाची सौंदर्य आणि पूर्णता, कल्पकता आणि नाविन्यपूर्णता, वापरकर्ता अनुकूल कार्यक्षमता. यातुन  मूल्यांकनाच्या प्रोजेक्ट निवडीसाठी  वापर केला जाणार आहे, विद्यार्थ्यांच...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास” कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
 संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास”  कार्यक्रम उत्साहात संपन्न नवीन  संकल्प आधारित उद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर मागणी डॉ. नवीन खंदारे   News Writer Prof. Ajay B Konge  :   जयसिंगपूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या उद्योजकता विकास आणि तंत्रज्ञान व्यवसाय इनक्यूबेटर सेल अंतर्गत ‘तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ ते १३ मार्च २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ, लोणेरे, इनोव्हेशन अँड इंक्युबॅशन मुख्य अधिकारी डॉ. नवीन खंदारे, सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार सी. बी. कोरा खादी ग्रामोद्योग आयोग प्राचार्य, डॉ. सी. बी. सिंथॉल कुमार, उमाकांत डोईफोडे, भारतीय युवाशक्ती ट्रस्टचे कोल्हापूर क्लस्टर हेड विश्वनाथ पवार, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागप्रमुख प्रा.अजय कोंगे, ईडीपी आणि टीबीआय सेल सर्व सदस्य, प्रा. सागर चव्हाण, प्राध्यापिका र...