संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजिनिअरिंगची उन्हाळी परीक्षा २०२४ मध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इंजिनिअरिंगची उन्हाळी परीक्षा २०२४ मध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम. कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४ मध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. वेगवेगळ्या विभागातून २९ विद्यार्थांनी इंजिनिअरिंगच्या विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत ७० पैकी ७० गुण मिळवून, राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान या ही वर्षी पटकाविला आहे, तसेच सहा विषयाचा निकाल १००% लागला आहे. या परीक्षेमध्ये विविध विभागातील मिळून एकूण ४३ विद्यार्थ्यांनी ९०% हुन अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. तृतीय वर्षातील विविध विभागातुन प्रथम क्रमांक सिद्धांत कर्नावट ९५.००%, द्वितीय क्रमांक निरंजन कुडाळकर ९४.३७%, व तृतीय क्रमांक अर्घ्य कोळेकर ९४.३२% गुण प्राप्त केले आहेत. द्वितीय वर्षामधील विविध विभागातुन प्रथम क्रमांक कु. कविता पुजारी ९६.२६%, द्वितीय क्रमांक कु. निर्झारा माणदे ९६.००% व तृतीय क्रमांक शार्मीन शेख ९५.०६.% गुण प्राप्त केले आहेत. प्रथम वर्षात...