संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री इंजिनिअरिंग, शॉर्ट टर्म कोर्सेस चा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्न
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री इंजिनिअरिंग, शॉर्ट टर्म कोर्सेस चा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्न *“ संस्थेची मूल्ये जपा, आरोग्याची काळजी घ्या आणि शिक्षणासोबत माणुसकीचे धडे गिरवा” डॉ. संजय जाधव* अतिग्रे, कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रेरणादायी सुरुवात करून देणारा डिग्री इंजिनिअरिंग व शॉर्ट टर्म कोर्सेसचा ‘प्रारंभ २०२६’ कार्यक्रम संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दुबई येथील सिल्कलँड ग्रुपचे सीओई डॉ. संजय जाधव, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी उपस्थित होते. यावेळी डिग्री इंजिनिअरिंग बेसिक सायन्स विभाग प्रमुख प्रा. शुभांगी महाडिक, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेसचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, ॲडमिशन सेलचे प्रमुख प्रा. नितीन जाधव, कार्यक्रम समन्वयक प्रा. गफूरसो मकानदार, डिग्री आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगचे सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या ...