दिंडी सोहळा व अध्यात्मिक ऊर्जा – प्रा. अजय बी. कोंगे
दिंडी सोहळा व अध्यात्मिक ऊर्जा – प्रा. अजय बी. कोंगे वारकरी संप्रदायाची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाची एक अत्यंत महत्त्वाची शिरा आहे. अशाच परंपरेचा एक भाग म्हणजे दिंडी सोहळा , जो भक्तीचा, सेवाभावाचा आणि सामाजिक समरसतेचा अनोखा संगम आहे. या दिंडीत सहभागी होणे म्हणजे केवळ पायी चालणे नव्हे, तर आत्म्याच्या शुद्धीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रवास होय. मला, वारकरी परंपरेत बालपणापासून सक्रिय आहे. माझ्या वडिलांच्या प्रेरणेतून मला कीर्तन, हरिपाठ, अभंग गायन आणि दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून अध्यात्मिक ऊर्जा अनुभवण्याची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धेचा वारसा पुढे नेण्याची संधी लाभली. दिंडी म्हणजे काय? दिंडी म्हणजे सामूहिक रूपाने भगवंताच्या चरणी अर्पण करणारा भक्तीमार्ग. हातात टाळ, डोक्यावर फडफडणारी भगवी पताका आणि ओठांवर अभंग – ही भक्तांची यात्रा एक सामाजिक साधना आहे. दिंडी हे एक प्रकारचे चालते मंदिरच आहे. अध्यात्मिक ऊर्जा कशी प्राप्त होते? या सोहळ्यात सहभागी होताना, मनातील अहंकार, द्वेष, लोभ, मत्सर यांचा विसर पडतो. एकात्मतेची भावना निर्माण होते. रा...