जागतिक युवा कौशल्य दिन 2025: AI आणि डिजिटल कौशल्यांचे महत्त्व प्रा. अजय कोंगे.
जागतिक युवा कौशल्य दिन 2025: AI आणि डिजिटल कौशल्यांचे महत्त्व जागतिक स्तरावर बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. १५ जुलै रोजी साजरा केला जाणारा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजे युवा वर्गाच्या कौशल्यविकासासाठी समर्पित एक विशेष दिवस. २०२५ साली या दिनाची थीम " AI आणि डिजिटल कौशल्यांचे महत्त्व" ही आहे. आजच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence) आणि डिजिटल कौशल्ये ही केवळ वैकल्पिक न राहता , अत्यावश्यक बनली आहेत. युवकांना यामध्ये प्रशिक्षित करून त्यांना रोजगारक्षम , उद्योजक व तंत्रज्ञानाशी सुसंगत बनवणे हे आजच्या काळाचे मोठे उद्दिष्ट ठरणार आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाचे महत्त्व : संयुक्त राष्ट्र संघटना यांनी २०१४ साली या दिवसाची घोषणा केली. हा दिवस युवकांमध्ये व्यावसायिक , तांत्रिक आणि व्यवहारिक कौशल्यांची जागरूकता निर्माण करतो. यामुळे नवे रोजगार तयार होतात , बेरोजगारी कमी होते आणि युवक समाजात सक्रीय भूमिका बजावतात. आज जगभरात बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आ...