'घोडावत विद्यापीठातर्फे’ मोफत तांत्रिक कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 2018-2019

'घोडावत विद्यापीठातर्फे’  मोफत  तांत्रिक कौशल्य विकास व उद्योजकता  प्रशिक्षण  कार्यक्रमाचे आयोजन

    संजय घोडावत विद्यापीठाच्या  कौशल्य विकास  आणि उद्योजकता विभागांतर्गत  सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना  तांत्रिक कौशल्य विकास व उद्योजकता मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे प्रशिक्षण दोन महिने कालावधीचे आहे.

     जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , कोल्हापूर आयोजित ग्रामीण भागातील वय वर्ष १८ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना  तांत्रिक कौशल्य विकास व उद्योजकता कोर्स चे प्रशिक्षण मोफत व कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी २००० रु. विद्यावेतन मिळेल  १)  फाऊंड्री टेक्नॉलॉजी  २) सीएनसी व्हीएमसी ऑपरेटर   या तांत्रिक प्रशिक्षण कोर्सेसचे आयोजन केलेले आहे.

      सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तांत्रिक प्रशिक्षणासोबत उद्योजकीय  गुणसंपदा , उद्योजकीय  व्यक्तिमत्व विकास,  इंग्रजी भाषेवर प्रभुत्व  , संभाषण कौशल्य , वेळेचे व्यवस्थापन, प्रेरणात्मक  मार्गदर्शन , संगणक ज्ञान , जीवन कौशल्य, आरोग्य  व पर्यावरण शिक्षण , विविध कंपन्यांना भेटी , मुलाखतीचे कौशल्य , उद्योजकता उभारणीसाठी आर्थिक मदतीचे मार्गदर्शन,  प्रकल्प अहवाल तयार करणे , शासनाच्या मुद्रायोजना या विषयी  सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षण कार्यक्रमात केले जाईल.

      इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन  यामध्ये १) जातीचे प्रमाणपत्र २) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र ३) रेशन कार्ड ४) आधार कार्ड ५) सेवायोजन नोंदणीकार्ड  ६) बँक पासबुक पहिले पान इ.
अधिक माहितीसाठी संपर्क कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, प्रमुख समन्वयक,
प्रा . अजय बी. कोंगे ९८५०३९२४६२
  http://goo.gl/kobnNw
या लिंकवर नांव नोंदणी करावी.

'आपला एक  शेयर  गरजू सुशिक्षित बेरोजगार कोल्हापूर जिल्हय़ातील युवक-युवतीस नोकरी किंवा  उद्योग उभारणी करण्याची संधी मिळवून देऊ शकतो.'



Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)