प्रा. अजय बबनराव कोंगे (एम.ए.एम.एड.) कौशल्य विकास


Prof. A.B. Konge ( M.A.M.Ed.,Pune University ) 
प्रा. अजय बबनराव कोंगे हे स्वयंसेवा उपक्रमध्ये  मुख्यतः कौशल्य विकास आणि उद्योजकता शिक्षण व प्रशिक्षणाच्या शक्तीवर केंद्रित असतात. ते  असे मानत की गरिबी कमी करण्यासाठी कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षण हे एक प्रभावी साधन आहे. 
          राष्ट्रीय नागरी जीववृद्धी मोहीम' ( एन यु एल एम) 'दीनदयाळ अंत्योदय योजना-   या केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता शिक्षण व प्रशिक्षण  प्रकल्पात काम सुरु केले,  सुशिक्षित बेरोजगारांना  रोजगार मिळण्याचे  उद्दीष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने,  आणि अवगत असणाऱ्या कौशल्याचा उपयोग  करून आधुनिक  तंत्रज्ञानाबद्दल योग्य  ते शिक्षण व प्रशिक्षण देऊन युवक-युवतींना  कौशल्य प्रशिक्षित करण्यासाठी एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आहेत.  पहिल्या कौशल्य विकास बॅचच्या ६६ युवक-युवतींना रोजगामिळून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तीन  वर्षाच्या  कालावधीत त्यांनी हजारो युवक –युवतींना केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास योजनाची व प्रशिक्षणाची जाणीवजागृती करून सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना, महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांना विविध केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी कौशल्य विकास कोर्सेसचे शासकीय योजनातून मोफत प्रशिक्षण देऊन नोकरी व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे.            महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानमहाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तांत्रिक व उद्योजकीय प्रशिक्षण,  दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य  योजनाकेंद्र शासनाचे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनाप्रधानमंत्री ग्रामीण डीजीटल साक्षरता अभियान. तांत्रिक कौशल्य विकास प्रशिक्षणव्हिडिओ निर्मिती व एडिटिंग प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरी कार्यशाळाकॉम्प्युटर  हार्डवेअरमुद्रा योजना, लघुउद्योग निर्मिती कार्यशाळा असे अनेक   कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले आहे.   तसेच जीवन जगण्यासाठी आवश्यक  असणारी कौशल्येसंभाषण कौशल्ये,  उद्योजकता व उद्योजकीय गुणसंपदा, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकासइंग्रजी भाषेचे प्रभुत्ववेळेचे व्यवस्थापन,  प्रेरणात्मक  मार्गदर्शन, संगणक ज्ञान, जीवन कौशल्येआरोग्य व पर्यावरण शिक्षण, विविध कंपन्यांना व शासकीय कार्यालयांना भेटीचे फायदे,   मुलाखत तंत्र व्यवस्थापनउद्योजकता उभारणीसाठी आर्थिक मदतीचे मार्गदर्शन, शासनाच्या बीजभांडवल महामंडळाची माहिती  या विषयी  सखोल मार्गदर्शन  प्रा.अजय कोंगे  आपल्या व्याख्यानाद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील  सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना, महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.  वंचित संवर्गातील  युवक-युवतींना  किमान रोजगार निर्माण होईल असे कोर्सेस  व अभ्यसक्रम  डिझाइन  करण्यात मोठा सहभाग आहे.
  प्रा. अजय बी. कोंगे  स्वयंसेवक असल्यामुळे त्यांना असे वाटते की समाजाच्या  छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत केल्यानेच आपल्याला मोठ-मोठ्या समस्यांचे आकलन होऊ शकते.