सारथी





सारथी म्हणजे काय?  हे माहीत नसलं तर समजून घ्या.   मला वाटतं की मराठा समाजातील बऱ्याच तरुणांना सारथी काय आहे हे समजले नाही त्यासाठीच मी सारथी विषयी काही माहिती संकलित करुन  आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे... नक्कीच अपेक्षा करतो की तुम्ही ही माहिती वाचून, समजून प्रत्येक मराठा तरुण पर्यंत पोहचवण्यासाठी मदत कराल.

१. सारथी काय आहे ?

सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था

ही संस्था #पुणे येथे कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून स्थापन केली होती.

२. *सारथी* स्थापन करण्याचा उद्देश काय ?

*सारथी* ची स्थापना *मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी समुदाय* आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा सामजिक , *आर्थिक* आणि *शैक्षणिक विकास* करण्यासाठी , या समुदायाला प्रशिक्षण , मार्गदर्शन करण्यासाठी सारथी ची स्थापना करण्यात आली.

३. शैक्षिणक क्षेत्रात विद्यार्थांना *सारथी* चा फायदा काय?

१) MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी या संस्थे अंतर्गत पुणे , दिल्ली येथे  MPSC /UPSC चे क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांना " निःशुल्क कोचिंग" ( अर्थात क्लासेसची पूर्ण फी) *सारथी भरणारही योजना राबवली जाते. तसेच या विद्यार्थांना मासिक वेतन दिले जाते (पुणेसाठी - ८००० प्रती महिना, दिल्ली - १३००० प्रती महिना)

२०१९ ला २२५ उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेतला होता.

२०२० ला २५० उमेदवारांना प्रवेश दिला जाणार होता.

2) NET/SETच्या विद्यार्थ्यांसाठी MPSC प्रमाणेच  NET/SET च्या विद्यार्थ्यांना ही  " निःशुल्क कोचिंग" योजनेचा आणि मासिक वेतनाचा लाभ घेता येतो.

३) M.phil/ Ph.D Fellowship

Ph.D/M.phil ला registration असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.या योजेअंतर्गत Ph.D   साठी २५००० प्रती महिना ५ वर्ष, M.phil साठी २५००० प्रती महिना २ वर्ष fellowship  मिळते.

४) मिलिटरी, पॅरा मिलिटरी,  पोलिस फोर्स च्या विद्यार्थ्यांसाठी मिलिटरी, पॅरा मिलिटरी, पोलिस फोर्स मध्ये भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसठी दोन वर्षाचे निवासी निःशुल्क प्रशिक्षण .

५) CMSTRT fellowship

Chief Minister Science and Technology Research Fellowship अंतर्गत  पत्र उमेदवारांना ( १वर्ष - ७००००प्रती महा.,  २वर्ष- ७०००० प्रती महा.

३वर्ष ७५००० प्रती महा., ४वर्ष ८००००प्रती महा., ५वर्ष ८००००प्रती महा.)  Fellowship  दिली जाते.

मित्रहो *सारथी* मार्फत या  राबवल्या जाणाऱ्या योजना  *मराठा* मुलांच्या शैक्षणिक विकासाठी खूप महत्वाच्या  आहेत.

६) या बरोबरच सारथी तर्फे कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते कौशल्य पुर्ण अभ्यासक्रमाचे उपक्रम राबविण्यात येतात यातुन *युवकांना* रोजगारास चालना मिळते महिला विकास, शेतीपूरक व्यवसाय निगडीत लघु उद्योग प्रशिक्षण दिले जाते.

सद्य परिस्थिती पाहिली तर सारथी संपवण्याचे कारस्थान चालू होते . *छत्रपती संभाजी महाराज* महाराजांनी *सारथी*   

अबाधित रहावी म्हणुन उपोषणही केलं होत. 

मित्रहो सरकार कोणतंही असो आपल्याला *सारथी* टिकवण खूप महत्वाचे आहे आणि हे मराठा समाजातील प्रत्येक घटकाचा काम आहे की *सारथी* अबाधित राहिली पाहिजे... अपेक्षा करतो की प्रत्येक जण *सारथी* अबाधित रहाण्यासाठी मदत करेल...

धन्यवाद.


Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)