Pmkvy पंतप्रधान कौशल्य विकास योजना

 पंतप्रधान कौशल्य विकास योजना.....

पंतप्रधान कौशल्य विकास योजना ही भारत सरकारची युवकांसाठी असलेली योजना, जुलै 2015 मध्ये सुरू करण्यात आली. याद्वारे कमी शिक्षण घेतलेल्या किंवा अर्ध्यातच औपचारिक शिक्षण सोडून दिलेल्या युवकांना रोजगाराच्या दृष्टीने विविध कौशल्ये शिकवून त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येते. 

◼️या योजनेच्या कालावधीत 3 महिने, 6 महिने किंवा 1 वर्षाचे रजिस्ट्रेशन करता येते. या योजनेअंतर्गत एखादा कोर्स पूर्ण केला की, सर्टिफिकेट दिले जाते. जे संपूर्ण देशभरात वैध मानले जाते. 

🎯 या योजनेअंतर्गत 2022 पर्यंत देशातील 40 कोटी लोक प्रशिक्षित झालेले असतील. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ज्या लोकांना स्वतःचा रोजगार सुरू करायचा आहे त्यांना कर्ज देखील मिळते. 

👨🏻 या तिसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 8 लाख युवकांना ट्रेनिंग देण्याचं उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. यासाठी सरकार 948.90 कोटी खर्च करत आहे. 

▶️ 28 राज्य, आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 777 जिल्ह्यामध्ये या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. यात रजिस्ट्रेशन करण्यासाठी उमेदवाराला आपली नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. 

💻 http://pmkvyofficial.org या वेबसाईटवर जाऊन आपले नाव, पत्ता, आणि लागणारी इतर माहिती भरणे आवश्यक आहे. एक फॉर्म भरल्यानंतर ज्या कोर्समध्ये ट्रेनिंग घ्यायची आहे, तो निवडावा लागेल आणि आणखी एक कोर्स निवडावा लागेल. 

👌त्यात ट्रेनिंग सेंटर आणि इतर माहिती दिलेली असेल. या कोर्ससाठी कोणतीही फीस लागत नाही. उलट सरकारच आपल्याला 8 हजार रुपये देते. 

⏳ *कालावधी*

ℹ️ यामध्ये 3 महिने, 6 महिने, आणि 1 वर्षभराचे रजिस्ट्रेशन असते. कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेशन देखील होते. 

 *कोर्सेस*

यात असणाऱ्या विविध कोर्समध्ये कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फुड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग, हँडीक्राफ्ट, जेम्स  तसेच ज्वेलरी, आणि लेदर टेक्नॉलॉजी यासारखे 40 टेक्निकल कोर्सेस  दिले आहेत.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)