मा. बबनराव ढाकणे साहेब
मा. बबनराव ढाकणे साहेब, माझी केंद्रीय ऊर्जा मंत्री, भारत सरकार यांची आज भेट घेऊन आशीर्वाद घेतले आणि साहेबांन सोबत विविध विषयावर सखोल चर्चा झाली.
पाथर्डी तालुक्याच्या आणि अहदनगर जिल्हा विकासात माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे साहेब यांचा मोलाचा वाटा आहे. ढाकणे साहेब यांनी आजपर्यंत चार वेळा आमदार, एक वेळा खासदारपद भूषविले. विधानसभेत विरोधी पक्षनेते असताना त्यांनी आपल्या भाषणबाजीची चुणूक दाखवून दिली. दुग्धविकास व ग्रामीण विकासमंत्री, बांधकाम राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द चांगली गाजली. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष भूषविले. गोवा मुक्ती संग्रामातील जिल्ह्यातील पहिले सत्याग्रही म्हणून ते ओळखले जातात. आंदोलने व सत्याग्रहाबद्दल त्यांना 32 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना, पाथर्डी तालुका कापूस जिनिंग प्रेसिंग सोसायटी, एकलव्य शिक्षण संस्था आदी संस्थांची ढाकणे साहेब यांनी स्थापना केली आहे.