Job fair 2022


 "संजय घोडावत पॉलिटेक्निक  मध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन"


  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा  संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे  येथे  ३० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.०० ते ३.०० या वेळात आयोजित केला  असल्याची माहिती संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी यांनी दिली आहे.  जिल्हयातील नामांकित खाजगी  आस्थापनाकडील ८५० पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून ७ वी  पास ते पदवीधर पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण,  आय टी आय, डिप्लोमा इंजिनिअर नोकरी इच्छुक उमेदवाराची प्रत्येक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.  मेळाव्यात कौशल्य विकासचे विविध कोर्सेस, स्टार्टअप इंडिया, व विविध शाकीय योजनांची सविस्तर माहिती, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे देणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त्त संजय कृ. माळी यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन कार्यक्रम व रोजगार मेळावा होणार आहे. रिक्त पदासाठी माहिती www.mhaswayam.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहे. 

 या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अजय बी. कोंगे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख, आशिष ए. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट  विभाग परिश्रम घेत आहेत.  या मेळाव्यास  अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.